अभूतपूर्व विकास साधण्यासाठी प्रामाणिक प्रशासन आवश्यक आहे. भ्रष्टाचार नष्ट करण्यासह पारदर्शक कारभार सुनिश्चित करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. उत्तरप्रदेशात आझमगढमध्ये ३४,००० कोटींहून अधिक खर्चांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण तसेच पायाभरणी केली. अशा प्रकारचा कार्यक्रम दिल्लीऐवजी आझमगढसारख्या ठिकाणी होत असल्याचा बदल झाल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला. एकेकाळी मागास म्हणून गणल्या जाणाऱ्या आझमगढसारखा भाग आज विकासाचा नवीन अध्याय लिहीत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. आझमगढ मध्ये आज ३४ हजार कोटींहून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी त्यांनी यावेळी केली.
(हेही वाचा – Rahul Shewale : गोवंडी येथे मोठ्या जल्लोषात मराठा भवनाचे लोकार्पण)
१२ नव्या टर्मिनल इमारतींचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन :
देशभरातील ९८०० कोटींहून अधिक खर्चांच्या १५ विमानतळ प्रकल्पांची पायाभरणी त्यांनी केली. देशभरातील पुणे, कोल्हापूर, ग्वाल्हेर, जबलपूर, दिल्ली, लखनौ, अलीगढ आझमगढ चित्रकूट, मोरादाबाद, श्रावस्ती आणि आदमपूर विमानतळांवरील १२ नव्या टर्मिनल इमारतींचे पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) उद्घाटन केले. कडाप्पा, हुबळी आणि बेळगावी या विमानतळांवरील म्हणजे तीन नवीन टर्मिनल इमारतींचे त्यांनी उद्घाटन केले. विमानतळांच्या बांधकामाच्या वेगाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले ग्वाल्हेर टर्मिनल केवळ १६ महिन्यात पूर्ण झाले. या कामांमुळे हवाई प्रवास सोपा होईल आणि देशाच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्यात येईल, असे त्यांनी सांगितले. घोषित केलेले प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण केल्याने हे प्रकल्प म्हणजे निवडणुकांसाठी असल्याचे दावे आपोआपच फेटाळले जातात असं ते म्हणाले. “मोदी हे वेगळ्याच मातीचे बनले आहेत हे लोकांना दिसत आहे. विकसित भारत बनवण्यासाठी मी अथकपणे काम करत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले; अफवांवर विश्वास ठेवू नका; मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन)
आझमगढला आता आजूबाजूच्या महानगरांवर अवलंबून रहायची गरज नाही :
विमानतळ, महामार्ग आणि रेल्वे यामधील पायाभूत सुविधांबरोबरच, शिक्षण, पाणी आणि पर्यावरणाच्या प्रकल्पांनाही आज गती मिळत आहे असं ते म्हणाले. आझमगढच्या लोकांना नवीन गॅरंन्टी देत पंतप्रधान म्हणाले, की आझमगढ हा आजन्म विकासाचा गढ म्हणवून घेईल. स्थानिक बोलीभाषेत पेतप्रधान म्हणाले की विमानतळ, रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय यासाठी आझमगढला आता आजूबाजूच्या महानगरांवर अवलंबून रहायची गरज नाही. (PM Narendra Modi)
लहान शहरांनाही विमानतळ, चांगले महामार्ग असण्याचा आधिकार :
हा भाग गेल्या दहा वर्षांमध्ये याआधीच्या खुशामतीच्या आणि घराणेशाहीच्या राजकारणाच्या जागी विकासाचे राजकारण अनुभवत आहे असे प्रधानमंत्र्यांनी सांगितले. याला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली नवी गती मिळत आहे असे पंतप्रधान म्हणाले. अलिगढ मोरादाबाद, आझमगढ श्रावस्ती यासारखे प्रदेश याआधी उत्तर प्रदेशातील मागास भाग म्हणून गणले जात होते ते आता सर्वांगिण विकासाबरोबरच हवाई मार्गाने जोडले गेले आहेत. जनकल्याण योजनांबरोबरच आधुनिक पायाभूत सुविधाही महानगरांच्या पुढे जात निमशहरे आणि गावामध्येही होत आहेत. मोठ्या महानगरांबरोबरच लहान शहरांनाही विमानतळ, चांगले महामार्ग असण्याचा आधिकार आहे. (PM Narendra Modi)
देशभर में तेज गति से विकास के प्रोजेक्ट्स का लोकार्पण और शिलान्यास हो रहा है। ये चुनाव के लिए नहीं, बल्कि विकास की मेरी अनंत यात्रा का अभियान है। pic.twitter.com/UxBFvlqTBZ
— Narendra Modi (@narendramodi) March 10, 2024
शहरीकरण असेच विनाखंड सुरु रहावे म्हणून आम्ही दुय्यम आणि तिसऱ्या दर्जाच्या ( टायर २ आणि टायर ३ ) शहरांचे बळ वाढवणार आहोत, असे पंतप्रधानांनी सांगितले. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरेंकडून मुंबईतील उमेदवाराची परस्पर घोषणा; काँग्रेसकडून विरोध)
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव देण्याची हमी :
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव देण्याची हमी हे सरकारचे लक्ष्य आहे असेही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. उसाचा उल्लेख करत अशा अनेक पिकांच्या किमान हमी भावात पुरेशी वाढ झाल्याचं ते म्हणाले. “आज उसाच्या शेतकऱ्याला मिळणारा किमान हमीभाव हा ८ टक्क्यांनी वाढला असून क्विंटलला ३४० रुपये झाला” असं ते (PM Narendra Modi) म्हणाले.
उत्तर प्रदेशाच्या बदलत्या चेहऱ्यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला :
विक्रमी स्तरावर होणारी गुंतवणुक, अनेक प्रकल्पांचे पायाभरणी समारंभ तसेच द्रुतगती मार्गांचे जाळे आणि महामार्गांचा विस्तार यामुळे उत्तर प्रदेशाच्या बदलत्या चेहऱ्यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. अयोध्येतील ऐतिहासिक राममंदिराच्या पूर्णत्वाचे उदाहरण देत कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यावर राज्याचे लक्ष केंद्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) उत्तर प्रदेशाची प्रशंसा केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community