गोयल यांनी राजीनामा देताना वैयक्तिक कारणे सांगितली
निवडणूक आयोगात (Election Commissioner) सध्या दोन निवडणूक आयुक्तांची पदे रिक्त आहेत. ती पदे भरण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीची १५ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता बैठक होणार आहे. नियमांनुसार, निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) व्यतिरिक्त दोन निवडणूक आयुक्त (Election Commissioner) असतात. निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे फेब्रुवारीमध्ये निवृत्त झाले. दुसरे अरुण गोयल यांनी ९ मार्च रोजी अचानक राजीनामा दिला. त्यामुळे सध्या तीन सदस्यीय निवडणूक आयोगात फक्त सीईसी राजीव कुमार आहेत. अरुण गोयल हे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) होण्याच्या मार्गावर होते, कारण सध्याचे CEC राजीव कुमार फेब्रुवारी २०२५ मध्ये निवृत्त होणार आहेत. गोयल यांनी २१ नोव्हेंबर २०२२ रोजी निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांचा कार्यकाळ ५ डिसेंबर २०२७ पर्यंत होता. गोयल यांनी राजीनामा देताना वैयक्तिक कारणे सांगितली आहेत. केंद्राने त्यांना पद सोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता.
Join Our WhatsApp Community