विजय हजारे (Vijay Hajare) हे नाव क्रिकेटविश्वात प्रचलित आहे. हजारे हे उजव्या हाताचे फलंदाज आणि उजव्या हाताचा मध्यम-गती गोलंदाज देखील होता. त्यांनी १४ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले होते. त्यांच्या जवळच्या मित्रांनुसार ते लाजाळू होते. ते चांगले बट्समन होते, पण कर्णधार झाल्यानंतर त्यांच्या फलंदाजीवर परिणाम झाला.
विजय मर्चंट यांच्या मते, “कर्णधारपदामुळे हजारे भारताचा सर्वोत्तम फलंदाज होऊ शकला नाही: ही भारतीय क्रिकेटची शोकांतिका आहे.” हजारे यांचा जन्म सांगली येथे एका मराठी ख्रिश्चन कुटुंबात १९१६ मध्ये झाला. गोलंदाजी करताना त्यांनी अनेक विक्रम स्वतःच्या नावावर कोरले. त्यांनी २४.६१ च्या सरासरी गोलंदाजी करत प्रथम श्रेणी सामन्यांत ५९५ विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे डोनाल्ड ब्रॅडमनला त्यांनी तीन वेळा बाद केले होते.
(हेही वाचा राहुल गांधी मानसिक संतुलन बिघडलेले; काँग्रेस बुडणारे जहाज; Acharya Pramod Krishnam यांची घणाघाती टीका)
आंतरराष्ट्रीय खेळाव्यतिरिक्त हजारे महाराष्ट्र, मध्य भारत आणि बडोदा संघाकडून खेळले. त्याने ३० कसोटी सामन्यांमध्ये ४७.६५ सरासरीने फलंदाजी करत २,१९२ धावा केल्या. १८,७४० धावा काढताना फलंदाजीचा सरासरी दर ५८.३८ एवढा होता. हा आणखी एक विक्रम म्हणाला लागेल. प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी ६० शतके ठोकली आहेत. १० वेळा डबल सेंच्युरी केली आहे. त्यांना १९९६ मध्ये सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. हा बीसीसीआयद्वारे माजी खेळाडूला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.
Join Our WhatsApp Community