ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकली. आणि त्यामुळे आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ पुन्हा एकदा अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकून भक्कम आघाडी घेतली आहे. इंग्लंड विरुद्ध पहिली कसोटी भारतीय संघाने २७ धावांनी गमावली होती. आणि त्यानंतर उर्वरित ४ कसोटी सामने मात्र भारताने मोठ्या फरकाने जिंकले. आणि त्याचा फायदा भारतीय संघाला क्रमवारीत मिळाला आहे. (Ind vs Eng Test Series)
(हेही वाचा- Nuwan Thushara Hat-Trick : मुंबई इंडियन्सचा नवीन ‘मलिंगा’ नुवान थुशाराची हॅट – ट्रीक )
शिवाय भारतीय संघ आता टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी अशा तीनही प्रकारात अव्वल आहे. कसोटीमध्ये भारतीय संघाचे १२२ रेटिंग पॉइंट झाले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ ११७ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लिश संघ १११ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. (Ind vs Eng Test Series)
India have reclaimed the top spot in the ICC Men’s Test Team Rankings after their 4-1 win over England in the #WTC25 series.
Details ➡️ https://t.co/IvK8I2Xm5r pic.twitter.com/neMvFM0CDR
— ICC (@ICC) March 10, 2024
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेचा निकाल काहीही लागला तरीही भारतीय संघ अव्वल स्थानावर राहू शकेल. भारतीय संघाचा सातत्यपूर्ण प्रवास यावर्षात अखंड सुरू आहे. एकदिवसीय प्रकारात भारतीय संघ १२१ गुणांसह या क्रमवारीत अव्वल आहे. इथेही ऑस्ट्रेलिया ११८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर टी-२० प्रकारात २६६ रेटिंग गुणांसह भारतीय संघ अव्वल आहे. तर इंग्लिश संध २५६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (Ind vs Eng Test Series)
(हेही वाचा- French Open Badminton : सात्त्विकसाईराज आणि चिरागने दुसऱ्यांदा जिंकली फ्रेंच ओपन सुपरसीरिज )
यापूर्वी सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ पर्यंत भारतीय संघ तीनही प्रकारात अव्वल स्थानावर होता. दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाल्यानंतर भारताने कसोटीतील अव्वल स्थान गमावलं होतं. त्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांमध्ये कसोटीतील अव्वल स्थानासाठी चुरस होती. (Ind vs Eng Test Series)
सध्या भारतीय संघ आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीतही अव्वल स्थानावर आहे. (Ind vs Eng Test Series)
युवा खेळाडूंचं योगदान
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत विराट कोहली संबंध मालिका तर के एल राहुल, जाडेजा, श्रेयस अय्यर हे अव्वल खेळाडू नव्हते. तर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचा निवड समितीने विचारही केला नाही. अशावेळी या मालिकेत सर्फराझ खान, ध्रुव जुरेल, रजत पाटिदार आणि आकाशदीप या खेळाडूंनी भारतीय संघात पदार्पण केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने संघाच्या कामगिरीत योगदान दिलं. (Ind vs Eng Test Series)
(हेही वाचा- Ravindra Waikar यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ..)
त्यामुळेच पहिल्या कसोटीतील पराभवानंतरही भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करू शकला. आणि अखेर ४-१ अशी मालिका जिंकूही शकला. यशस्वी जयसवालने सलामीला आणि शुभमन गिलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना जबाबदारीने फलंदाजी केली. त्यामुळे भारतीय संघासाठी ही मालिका स्थित्यंतराची होती. (Ind vs Eng Test Series)
मागच्या वर्षभरात कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० प्रकारातही भारतीय संघाने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं आहे. म्हणूनच तीनही प्रकारात अव्वल स्थान राखणं शक्य झालं आहे. (Ind vs Eng Test Series)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community