Lok Sabha Elections 2024 : महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य अजूनही थांबता थांबेना…

261
Lok Sabha Election : काँग्रेसची ४३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तसेच महायुतीमध्ये बैठकांचा जोर सुरू आहे. अजूनही जागा वाटपाचे फॉरमॅट ठरलेले नसताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मुंबईतील उमेदवार जाहीर करण्यात आले यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते तसेच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीने देखील सोशल मीडिया वरती आपली नाराजी ओपनली व्यक्त केली.महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या दोन पक्षांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला स्थान देण्यात येणार असल्याचे बोलले जात असून आम्हाला विचारत न घेता जागावाटप होत असल्याचे वंचितने म्हटले आहे. (Lok Sabha Elections 2024)
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उपनेते आणि युवा सेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. त्यापूर्वी, धाराशिव लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेत, तेथेही खासदार ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. दुसरीकडे, शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंची उमदेवारी घोषित केली असून त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली. दरम्यान, महाविकास आघाडीचं अद्याप जागावाटप झालं नाही, तरीही उमेदवारी घोषित होत असल्याने वंचितने स्पष्टी नाराजी व्यक्त केली असून महाविकास आघाडीला सल्लाही दिला आहे. (Lok Sabha Elections 2024)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.