Devendra Fadnavis : दुसऱ्याच्या कामाचे श्रेय आम्ही घेत नाही; कोस्टल रोडवरून फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका

काही लोक फेसबुक, इन्स्टाग्राम आणि फेसबुक लाईव्ह करुन कोस्टल रोड प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. पण या प्रकल्पाच्या कामाला राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने वेग आला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

877
Devendra Fadnavis : दुसऱ्याच्या कामाचे श्रेय आम्ही घेत नाही; कोस्टल रोडवरून फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज म्हणजेच सोमवार ११ मार्च रोजी मुंबईच्या कोस्टल रोडचे (Coastal Road) उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार अरविंद सावंत यांना देखील आजच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले होते; मात्र आदित्य ठाकरे या सोहळ्यासाठी गेले नाहीत.

(हेही वाचा – Ravindra Waikar यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ..)

उद्घाटनानंतर बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “दुसऱ्याच्या कामाचे श्रेय आम्ही घेत नाही” अशा शब्दांमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर ठाकरे गटाचे ‘बाळराजे’ असा उल्लेख करत निशाणा साधला आहे. आम्ही केलेल्या कामांचे श्रेय महायुती सरकार घेत आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे आम्ही लोकं नाही असे फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा – Russia Ukraine War : पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपानंतर पुतीन यांनी बदलला युद्धाचा निर्णय)

कोस्टल रोडच्या प्रझेंटेशनवर ठाकरे गटाने निवडणूक लढवली :

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले की; मला काल समाजमाध्यमावर पाहिलं उबाठाचे बाळराजे सांगत होते की कोस्टल रोड आम्ही केला आणि आमच्या कामाचे श्रेय ते घेत आहेत. पहिल्यांदा तर मी त्यांना सांगतो की, आम्ही दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाहीत. जे काम आम्ही करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो. या कोस्टल रोडची संकल्पना नवी नव्हती. मला आठवतं उद्धव ठाकरेंनी तर मुंबई महापालिकेच्या दोन निवडणुका या कोस्टल रोडचं प्रझेंटेशन दाखवूनच पार पाडल्या. कोस्टल रोड मात्र कधी झालाच नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.

अर्ध्यापेक्षा अधिक रहदारी कमी होईल : 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले की, या किनारी रस्त्याची एक लेन आपण आजपासून चालू करत आहोत. लवकरच आपण संपूर्ण रस्ता चालू करू. सध्या सुरू करण्यात येणाऱ्या एका लेनमुळेदेखील मुंबईकरांना खूप फायदा होणार आहे. मुंबईकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळेच एका लेनचे काम पूर्ण झाले असून तो मार्ग बंद ठेवण्यात फायदा नाही. हा मार्ग सुरू झाल्यावर अर्ध्यापेक्षा अधिक रहदारी कमी होईल. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा मार्ग चालू करण्याचा निर्णय घेतला.

(हेही वाचा – Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचा एसबीआयला दणका! न्यायालयाने फेटाळली निवडणूक रोख्यांवरील याचिका)

फडणवीसांनी केले महापालिका अधिकाऱ्यांचे कौतुक :

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणातून अधिकारी अश्विनी भिडे आणि इक्बालसिंह चहल यांचे कौतुक केले. अश्विनी भिडे यांनी कोस्टल रोड प्रकल्पातील अनेक अडचणी सातत्याने पाठपुरावा करुन दूर केल्या. त्यांनी खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला नेतृत्त्व दिले, असे फडणवीस म्हणाले. तर राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर इक्बालसिंह चहल यांनी अत्यंत वेगाने काम करण्यासाठी मदत केली, याबद्दल अभिनंदन, असे फडणवीस यांनी म्हटले. काही लोक फेसबुक, इन्स्टाग्राम आणि फेसबुक लाईव्ह करुन कोस्टल रोड प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. पण या प्रकल्पाच्या कामाला राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने वेग आला, अशी टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.