Temple : महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनात मंदिरांच्या सर्व समस्या सोडवण्याचा सर्व मंदिर विश्वस्तांचा निर्धार

171

मंदिरे (Temple) ही सनातन धर्माची आधारशीला आहे, तसेच हिंदूंच्या संघटनाचे हे महत्वाचे केंद्र आहे; मात्र आज सरकारीकरणामुळे मंदिरांचे व्यवस्थापन मंदिर, धर्म, देवता यांविषयी काहीही न वाटणार्‍या व्यक्तींच्या हाती गेले आहे. सरकारीकरणामुळे हिंदूंच्या प्रथा, परंपरा खंडित होत आहेत. हे चित्र पालटण्यासाठी आणि मंदिरे भाविक-भक्त यांच्या नियंत्रणात हवीत, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनात सर्व मंदिर विश्वस्तांनी केली. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने रत्नागिरी येथील ‘श्रद्धा साफल्य मल्टीपर्पज हॉल’ मंदिर अधिवेशन संपन्न झाले. या वेळी जिल्ह्यातील संत, पुरोहित, पुजारी, मंदिर विश्वस्त, मंदिरांसाठी लढणारे अधिवक्ता, मंदिर प्रतिनिधी आदी ३०० हून अधिक जण सहभागी झाले होते.

या वेळी खेड तालुका वारकरी संघटनेचे सचिव ह.भ.प. गणपत महाराज येसरे, श्री महाकाली देवस्थान आडिवरेचे स्वप्निल भिडे, कशेळी येथील श्री कनकादित्य मंदिराचे रमाकांत ओळकर, श्री महादलिंग देवस्थान १५ गाव धामणंद खेडचे संतोष उतेकर, श्री शारदादेवी देवस्थान तुरंबव चिपळूणचे अध्यक्ष कृष्णा पंडित, नामदेव शिंपी समाजोन्नती मंडळ चिपळूणचे अध्यक्ष आणि सीए विवेक रेळेकर, पिरंदवणे येथील श्री सोमेश्वर सुंकाई इंडोव्हमेंट ट्रस्टचे सुनीत भावे, गुरव समाजाचे जिल्हाध्यक्ष  लक्ष्मण गुरव, संस्थान श्री देव गणपतीपुळेचे चैतन्य घनवटकर, श्री अखिल गुरव समाज संघटनेचे कार्याध्यक्ष उमेश गुरव, दिनेश बापट, दापोली जालगावचे ग्रामदैवत श्री देव भैरीचे उपाध्यक्ष आणि महाकाली देवस्थानचे अध्यक्ष रमेश कडू, श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर देवस्थान राजीवडाचे अध्यक्ष प्रवीण वायंगणकर, श्री नवलाई पावणाई जाकादेवी महापुरुष मंदिराचे राजेंद्र सावंत आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

कुठलेही एक मंदिर बंद होणे, म्हणजे ७ पिढ्यांचे भवितव्य बंद होणे ! – डिगंबर महाले  

संस्था, संघटना कोणतीही असो, त्यातील पदाधिकारी, चालक यांच्या विचारात सुस्पष्टता हवी, तरच मंदिरांचे व्यवस्थापन व्यवस्थित होऊ शकते. पुजारी विश्वस्तांना मिळणारा मान हा केवळ त्यांचा नसून तो देवाचा आहे. देशात हिंदु समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात असूनही हिंदूंना मंदिर (Temple) रक्षणासाठी विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी आता दबावतंत्रच अवलंबवावे लागेल. आपले कुठलेही एक मंदिर बंद होणे याचा अर्थ पुढील ७ पिढ्यांचे भवितव्य बंद होईल, असे श्री मंगळग्रह संस्थान, अंमळनेर, जळगावचे अध्यक्ष डिगंबर महाले म्हणाले.

(हेही वाचा Veer Savarkar : राजस्थान सरकारचा स्वागतार्ह निर्णय; पाठ्यक्रमात शिकवणार महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांचा इतिहास)

मंदिरांच्या व्यवहारात राजकारण नको, तर व्यवहार धर्मानुसार हवा ! – रमेश शिंदे 

आज बर्‍याच मंदिरात (Temple) मानपानावरून भांडणे होतात. मंदिर रक्षणासाठी स्वतःचे मानपान बाजूला ठेवायला हवेत. मंदिर सरकारच्या ताब्यात गेले, तर राजकीय मंडळी अन्य क्षेत्रात जे घोटाळे करतात तेच मंदिरातही चालू करतील. विश्वस्तांच्या आपापसांतील भांडणामुळे सरकारला मंदिरांचे सरकारीकरण करण्याची संधी मिळून आपली मंदिरे बंद पडत आहेत, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले.

… तर देश विश्वगुरु बनायला वेळ लागणार नाही ! – सुनील घनवट

अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाची स्थापना झाल्यावर विश्वभरात जागृती झाली, तर देशभरातील सर्वच मंदिरामधून जागृती झाल्यास देश विश्वगुरु बनायला वेळ लागणार नाही. मंदिरांचे (Temple) पावित्र्य राखण्यासाठी ५०० मीटरच्या परिसराच्या मद्यमांस बंदी झाली पाहिजे; परंतु गणपतीपुळे येथे श्री गणपती मंदिराच्या ३०० मीटर आवारातच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रेस्टोरंट आहे ते शासनाने बंद केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य करत असूनही सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या मंदिराचे अनुदान शासनाने तात्काळ वाढवावे. मंदिरांसाठी आपल्याला आज अधिवेशन घ्यावे लागते, हे दुर्दैव आहे. वक्फ बोर्डाच्या माध्यमातून जे भूमी बळकावण्याचे षड्यंत्र आहे, त्यासाठी वक्फ बोर्ड कायदाच रद्द केला पाहीजे, असे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे  समन्वयक सुनील घनवट म्हणाले.

जन्महिंदूला कर्महिंदु बनवण्याचे कार्य मंदिराच्या माध्यमातून होते ! – सद्गुरु सत्यवान कदम

समाजाला एकसंघ ठेवण्याचे, जन्महिंदूपासून कर्महिंदु बनवण्याचे कार्य मंदिराच्या माध्यमातून होत असते. श्रद्धेने केलेली कृती लाभदायक ठरते, असे अध्यात्मशास्त्र सांगते. धर्मशिक्षणाने मंदिर (Temple)  संस्कृती संवर्धन होण्यास साहाय्य होईल. ईश्वरी अधिष्ठान ठेवून कार्य केले, तर ईश्वराचे आशीर्वाद मिळाल्याने कार्य यशस्वी होते. आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी प्रतिदिन काळानुसार नामसाधना करणे आवश्यक आहे, असे सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.