Maratha Reservation : कर्णिकांच्या अध्यक्षतेखाली SIT गठीत; आरक्षण आंदोलनातील हिंसक घटनांची चौकशी

सदर तपास पथकामध्ये निमंत्रित सदस्य म्हणून तज्ञ व्यक्तींना बोलविण्याचे अधिकार विशेष पास पथकाचे प्रमुख यांना राहतील.

242
Maratha Reservation : कर्णिकांच्या अध्यक्षतेखाली SIT गठीत; आरक्षण आंदोलनातील हिंसक घटनांची चौकशी

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाच्या दरम्यान राज्यात घडलेल्या हिंसक घटनांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती (SIT) गठीत करण्यात आली आहे. या समितीला तीन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या विरोधात केलेल्या विधानांचे पडसाद उमटले होते. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत आंतरवली सराटी प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या हिंसक घटनांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. (Maratha Reservation)

त्यानुसार गृह विभागाने सोमवारी एसआयटी (SIT) नेमण्याबाबतचा शासन निर्णय जारी केला. एसआयटीने राज्यात आरक्षणाविषयी विविध ठिकाणी आंदोलने सुरु असताना आंदोलनाचा गैरफायदा घेऊन सामाजिक सलोखा आणि वातावरण अस्थिर करण्यासाठी जाळपोळ, दगडफेकीसारख्या हिंसक घटना जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करणे. मिडिया, सोशल मिडियाचा गैरवापर करुन चुकीची माहिती देऊन तसेच अफवा पसरवून दंगे भडकविण्याचा प्रयत्न करणे या आणि इत्यादी बाबींसंदर्भात चौकशी करुन तीन महिन्यात राज्य सरकारला अहवाल सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Mumbai Crime Branch : घरफोड्या करण्यासाठी विमानाने फिरणारी आंतरराज्यीय बांगलादेशी टोळी गजाआड)

सदर तपास पथकामध्ये निमंत्रित सदस्य म्हणून तज्ञ व्यक्तींना बोलविण्याचे अधिकार विशेष पास पथकाचे प्रमुख यांना राहतील. याशिवाय विशेष तपास पथकासाठी आवश्यक मनुष्यबळ राज्य सरकारच्या सहमतीने नियुक्त करण्याचे अधिकार विशेष तपास पथक प्रमुख यांना राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी राज्यमंत्री प्रकाश सोळुंके, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घर आणि कार्यालयांना लक्ष्य केले होते. कार्यकर्त्यांनी निवासस्थानाना आग लावली होती. या हिंसक घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले होते. (Maratha Reservation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.