चकमक फेम पोलिस अधिकारी दया नायक याच्या बदलीवर मॅटकडून स्थगिती देण्यात आली आहे. मॅटच्या या निर्णयामुळे दया नायकला मोठा दिलासा मिळाला आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटचे प्रभारी अधिकरी असलेले दया नायक, यांची बदली गोंदिया येथे करण्यात आली होती. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी मागील आठवड्यात काढण्यात आलेल्या बदलीच्या आदेशात, दया नायक याला गोंदिया येथे जात प्रमाणपत्र पडताळणी विभागात बदली करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाकडून मुंबई तसेच ठाण्यातील काही पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. या आदेशात मुंबई पोलिस दलातील सुधीर दळवी, नंदकिशोर गोपाळे, सचिन कदम आणि केदारी पवार तसेच ठाणे पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे आणि खंडणी विरोधी पथकाचे राजकुमार कोथमिरे, दहशतवाद विरोधी पथकात असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या मुंबईतील जुहू युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांची बदली गोंदिया जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी विभागात करण्यात आली होती.
(हेही वाचाः मुंबई पोलिस दलातील ३७० पोलिस सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर!)
मॅटचा निकाल
दया नायक यांनी या बदलीला महाराष्ट्र अॅडमिनीस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल(मॅट) मध्ये आव्हान दिले होते. मॅटकडून दया नायक यांच्या बाजूने निकाल देण्यात आला आहे. त्यामुळे दया नायकच्या बदलीवर स्थगिती आली असून, दया नायक आहे त्याच पदावर त्याच ठिकाणी पुन्हा रुजू होण्याचे आदेश मॅटकडून बुधवारी देण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community