गोरेगाव (Goregaon) पश्चिम येथील शाळेसाठी आरक्षित भूखंडावरील पडीक अवस्थेतील निवासी गाळे येत्या ४८ तासात ताब्यात घेऊन त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, असे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांना सोमवारी लोकशाही दिनानिमित्त आयोजित सुनावणी दरम्यान दिले. आतापर्यंत तीन लोकशाही दिनांमध्ये प्राप्त झालेल्या ४१ अर्जांपैंकी तब्बल ३२ अर्ज जयस्वाल यांनी निकालात काढले. (Goregaon)
भूखंड मोकळा करून घ्यावा
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात तिसरा लोकशाही दिन उत्साहात संपन्न झाला. सोमवारी झालेल्या लोकशाही दिनासाठी प्राप्त १० अर्जांवर जयस्वाल यांनी यशस्वी सुनावणी दिली. नूतन विद्या मंदिर संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालयास दिलेल्या २० निवासी गाळ्यांच्या संदर्भात प्राप्त अर्जावर सुनावणी देते वेळी जयस्वाल यांनी संबंधित मंडळाच्या अधिकार्यांना र्निर्देश दिले. म्हाडाचा हा भूखंड शाळेसाठी आरक्षित आहे. या भूखंडावरील निवासी गाळे अत्यंत पडीक अवस्थेत असल्याने ते गाळे येत्या दोन दिवसात ताब्यात घेण्यात यावेत व त्यानंतर त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच सदर निवासी गाळे दुरुस्ती करण्यापलीकडे गेले असतील तर ते पाडून भूखंड मोकळा करून घ्यावा. अशा प्रकारे अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न लोकशाही दिनाच्या निमित्ताने निकाली काढण्यात आला. (Goregaon)
प्रलंबित बाबीवर सदनिका हस्तांतरणाचा निर्णय सकारात्मक
त्याचप्रमाणे गाळे हस्तांतरण प्रकरणामध्ये अर्जदार रामदास भोसले यांनी मालवणी मालाड येथील सन २००४ मध्ये म्हाडाची घेतलेली सदनिका सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही हस्तांतरित होत नसल्याचे अर्जाद्वारे सादर केले. त्यानुषंगाने जयस्वाल यांनी संबंधित अधिकार्यांना नियमांच्या अधीन राहून अर्जदारांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्जदाराच्या नावे हस्तांतरण करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मुंबई मंडळाच्या संबंधित मिळकत व्यवस्थापक यांना निर्देश दिले. अनेक वर्षांपासून प्रलंबित बाबीवर सदनिका हस्तांतरणाचा निर्णय सकारात्मकरित्या हाताळल्याने भोसले यांनी आनंद व्यक्त करीत म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांचे आभार मानले. (Goregaon)
(हेही वाचा – CAA मध्ये मुसलमानांचा समावेश का नाही ? CAA चा NRC शी काय संबंध आहे ?)
अतिक्रमण हटवण्यात यावे
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे पाचपाखाडी ठाणे येथील योजना कोड क्रमांक २३९ अंतर्गत अशोक परब यांना सन २०१४ मध्ये वितरित केलेल्या भूखंडाचा ताबा अर्जदाराला सर्व कायदेशीर कार्यवाही करून १५ दिवसांत देण्यात यावा, असे निर्देश जयस्वाल यांनी दिले. या भूखंडावर अतिक्रमण झाले असल्यास अतिक्रमण हटवण्यात यावे व भूखंडाचे क्षेत्रफळ कमी आढळून आल्यास अर्जदारला इतरत्र भूखंड देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, असेही निर्देशही जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Goregaon)
सोमवारी झालेल्या लोकशाही दिनामध्ये प्राप्त उर्वरित अर्जाबाबत सर्व अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले. या लोकशाही दिनाला ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, निवासी कार्यकारी अभियंता पी. बी. सानप, कार्यकारी अभियंता निलेश मडामे, कार्यकारी अभियंता रूपेश राऊत आदी उपस्थित होते. (Goregaon)
केवळ ०९ अर्ज प्रलंबित
मागील ०८ जानेवारी, २०२४ रोजी झालेल्या पहिल्या लोकशाही दिनानिमित्त प्राप्त १५ अर्ज व १३ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या दुसऱ्या लोकशाही दिनाच्या निमित्ताने प्राप्त १६ अर्ज प्रकरणी अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेत कार्यवाही करण्यात आली आहे. आजतागायत तिन्ही लोकशाही दिन मिळून ४१ अर्ज प्राप्त झाले असून ३२ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. ०९ अर्ज प्रलंबित असून त्यापैकी ५ अर्ज इतर शासकीय आस्थापनांशी निगडीत असल्याने त्यांच्याकडे उचित कार्यवाहीसाठी हस्तांतरित करण्यात आले आहेत. (Goregaon)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community