Volvo EX90 : स्विडिश ऑटोमेकर वॉल्वोची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक कार भारतात दाखल

Volvo EX90 : वॉल्वो कंपनी भारतात यंदा दोन नवीन इलेक्ट्रिक गाड्या लाँच करण्याच्या तयारीत 

256
Volvo EX90 : स्विडिश ऑटोमेकर वॉल्वोची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक कार भारतात दाखल
Volvo EX90 : स्विडिश ऑटोमेकर वॉल्वोची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक कार भारतात दाखल
  •  ऋजुता लुकतुके

वॉल्वो ही स्विडिश कारमेकर कंपनी यंदा भारतात दोन नवीन संपूर्णपणे इलेक्ट्रिक असलेल्या स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल भारतात लाँच करण्याची तयारी चालवली आहे. ईएक्स९० आणि ईएक्स३०. या दोन्ही गाड्यांचं बुकिंग २०२४ च्या मध्यावर सुरू होईल. आणि त्या २०२५ च्या सुरुवातीला रस्त्यावर धावताना दिसतील, अशी शक्यता आहे. वॉल्वोची आधीची एक्ससी९० बंद होऊन त्या जागी ईएक्स९० बाजारात येईल, अशी शक्यता आहे. (Volvo EX90 )

(हेही वाचा- Cabinet Decision : राज्यातील जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय)

ईएक्स९० गाडी ५ सीटर आणि ७ सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. शिवाय ही गाडी फ्रंट-व्हील ड्राईव्ह तसंच ऑल-व्हील ड्राईव्ह अशा दोन प्रकारात ग्राहकांना उपलब्ध असेल. आणि गाडीची सर्वोत्तम क्षमता ५१५ बीपीएच आणि रेंज ५९० किमींची असेल. या गाडीत स्वयंचलित वाहन यंत्रणा तसंच दोन डिस्प्ले आणि क्लायमॅट कंट्रोलही असणार आहे. जगभरात या गाडीचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर गाजतो आहे. (Volvo EX90 )

तर वॉल्वो कंपनीची सबएसयुव्ही असलेली ईएक्स३० ही कार २०२३ पासून भारतीय रस्त्यांवर धावतेय. ही कार सिंगल मोटर किंवा डबल मोटरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. आणि या कारची रेंज ३४० किमी ते ४६० किमी अशी आहे. तर या इंजिनाची क्षमता २७६ बीएचपी ते ४२८ बीएचपी इतकी आहे. (Volvo EX90 )

(हेही वाचा- Israel-Hamas Conflict : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली नेतन्याहू यांची भेट)

ईएक्स९० आणि ईएक्स३० गाड्यांनी वॉल्वो कंपनीने इलेक्ट्रिक कार क्षेत्रात आता मोठी मुसंडी मारली आहे. जुन्या आयसीई क्षेत्राकडून कंपनीने इलेक्ट्रिक गाडीकडे आपलं लक्ष वळवलं आहे. (Volvo EX90 )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.