राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दहशतवादी आणि गुंडांवर मोठी कारवाई केली आहे. एनआयएच्या (NIA) पथकाने मंगळवारी, १२ मार्च रोजी सकाळी पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये छापे टाकले.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मंगळवारी पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि चंदीगडमध्ये दहशतवादी आणि गुंडांच्या संबंधात सुरू असलेल्या तपासासंदर्भात 30 ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हटले आहे. सध्या एनआयएची कारवाई सुरू आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या (NIA) छापे टीमने या राज्यांमध्ये 30 ठिकाणी शोध घेत आहे. एनआयएचे पथक पंजाबमधील फरीदकोट येथील कोटकपुरा येथील एका व्यावसायिकाच्या घराची झडती घेत आहे. देशातील दहशतवादी आणि गुंड यांच्या विरुद्धचा संबंध संपवण्यासाठी NIA ने ही कारवाई केली आहे.
(हेही वाचा CAA कायदा लागू केल्यावर गृहमंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…)
27 फेब्रुवारीलाही छापा टाकला
विशेष म्हणजे एनआयएने 27 फेब्रुवारीला दहशतवादी आणि गुंडांच्या संगनमताच्या प्रकरणात छापा टाकला होता. एनआयएने 16 ठिकाणी कारवाई केली, ज्यात पंजाबमधील 14 आणि राजस्थानमधील दोन ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय एनआयएने सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
Join Our WhatsApp Community