KTM 125 Duke (2024) : केटीएम ड्यूक (२०२४) मध्ये पाच महत्त्वाचे अपग्रेड 

KTM 125 Duke (2024) : पुढील दोन महिन्यांत केटीएम ड्यूकचं अद्ययावत मॉडेल भारतात दाखल होणार आहे 

243
KTM 125 Duke (2024) : केटीएम ड्यूक (२०२४) मध्ये पाच महत्त्वाचे अपग्रेड 
KTM 125 Duke (2024) : केटीएम ड्यूक (२०२४) मध्ये पाच महत्त्वाचे अपग्रेड 
  • ऋजुता लुकतुके

केटीएम कंपनीने अलीकडेच जगभरात सिंगल सिलिंडर रेंजच्या ड्यूक १२५, ड्यूक २५०, ड्यूक ९० या बाईकचं आधुनिकीकरण केलं आहे. जगभरात कंपनीने अद्ययावत मॉडेल लाँच केली आहेत. आता भारतातही केटीएम १२४ ड्यूक २०२४ ही बाईक दाखल होणार आहे. या गाडीत झालेले चार मोठे बदल आता बघूया. (KTM 125 Duke (2024))

(हेही वाचा- Volvo EX90 : स्विडिश ऑटोमेकर वॉल्वोची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक कार भारतात दाखल)

ड्यूक १२५ (२०२४) या गाडीच्या स्टायलिंगमध्ये झालेले बदल हे माफक असले तरी ते आधुनिकीकरणाकडे झुकणारे आहेत. गाडीच्या हेडलँपची रचना बदलण्यात आलीय. तिथे आता आधुनिक क्लस्टर आहे. तर नवीन बाईकमध्ये इंधनाच्या टाकीचा क्षमता आणि आकार दोन्ही बदलण्यात आला आहे. आणि तो तरुणांना आवडेल असा करण्यात आलाय. (KTM 125 Duke (2024))

तर गाडीची सीटही पूर्णपणे बदलण्यात आली आहे. आताची सीट ही चालक आणि सहप्रवासी अशा दोघांसाठी जास्त आरामदायी असल्याचं बोललं जातंय. (KTM 125 Duke (2024))

(हेही वाचा- दहशतवादी आणि गुंडांवर NIAची कारवाई; पंजाब-हरियाणासह राजस्थानमध्ये 30 ठिकाणी छापे)

गाडीतील सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे तो गाडीच्या मध्यभागी असलेला डिस्प्ले. जुन्या ॲनालॉग डिस्प्लेच्या ऐवजी इथं ५ इंचांचा डिजिटल डिस्प्ले आहे. आणि हा डिस्प्ले आता फोनलाही जोडता येणार आहे. त्यामुळे फोनमार्फत तुम्ही गाणी लावू शकता. तसंच नेव्हिगेशनही वापरू शकता. (KTM 125 Duke (2024))

नवीन बाईकची फ्रेम स्टील आणि ॲल्युमिनिअमची आहे. बाईकचे नवीन १७ इंच त्रिज्येची चाकं ही जास्त वजनाने हलकी आहेत. आणि त्यांची रस्त्यावरची पकडची आधीपेक्षा मजबूत आहे. ड्यूक १२५ बाईकचं इंजिन तसं जुनंच आहे. पण, त्यातही काही महत्त्वाचे बदल मात्र कंपनीने केले आहेत. या इंजिनाचा एअरबॉक्स मोठा आहे. आणि त्यामुळे इंजिनाची क्षमता ०.५ हॉर्सेस आणि ०.५ एनएमनी वाढली आहे. (KTM 125 Duke (2024))

(हेही वाचा- Cabinet Decision : राज्यातील जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय)

याशिवाय या बाईकमध्ये सुपरमोटो एबीएस प्रणालीही बसवण्यात आली आहे. या गाडीची भारतातील किंमत १.४१ लाख रुपये इतकी असेल अशी शक्यता आहे. (KTM 125 Duke (2024))

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.