Royal Enfield Roadster 450 : रॉयल एनफिल्डची नेकेड रोडस्टर बाईक भारतात दाखल होण्यासाठी तयार 

Royal Enfield Roadster 450 : रॉयल एनफिल्ड रोडस्टर ४५० बद्दल आतापर्यंत कळलेल्या गोष्टी 

560
Royal Enfield Roadster 450 : रॉयल एनफिल्डची नेकेड रोडस्टर बाईक भारतात दाखल होण्यासाठी तयार 
Royal Enfield Roadster 450 : रॉयल एनफिल्डची नेकेड रोडस्टर बाईक भारतात दाखल होण्यासाठी तयार 
  • ऋजुता लुकतुके

रॉयल एनफिल्ड ही बाईकचा पारंपरिक लूक कायम ठेवणारी बाईक आहे. तसंच रोडस्टर ४५० च्या बाबतीतही आहे. पण, फिचर्समध्ये मात्र आधुनिकता आणली आहे. बाईकचे दिवे एलईडी आहेत. तर इंधनाची टाकी चालकाला बसणं सोपं जाईल अशा डिझाईनमध्ये बदलण्यात आली आहे. तर सीटही आकर्षक आणि आधुनिक आहे. हिमालय ४५० बाईकची स्टाईल पण, आधुनिकता असलेली ही बाईल आहे. (Royal Enfield Roadster 450)

(हेही वाचा- Bombay High Court : २७३ कोटी खर्च केले तरी रस्त्यांवर खड्डे कसे? मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले)

बाईकमधील इंजिन हे शेर्पा ४५० इंजिन आहे. याची क्षमता ४५२ सीसी आहे. आणि ते लिक्विड-कूल्ड पद्धतीचं आहे. तर या इंजिनातून ३९.४७ बीएचपी इतकी ताकद निर्माण होते. एक सिलिंडर असलेली मोटर ६ स्पीड गिअरना ऊर्जा पुरवते. (Royal Enfield Roadster 450)

बाईकमधील फिचर्स अत्याधुनिक आहेत. बाईकला चहू बाजूने असलेले दिवे हे एलईडी आहेत. तर डिस्ल्पेही पूर्णपणे डिजिटल आणि ब्लूटूथने फोनला जोडलेला असेल. यात नॅव्हिगेशनची सोय असेल. गुगल मॅप इथं दिसतील. (Royal Enfield Roadster 450)

गाडीची चाकं १७ इंच अलॉय व्हील्स आहेत. आणि रस्त्यावर चांगली पकड असलेले टायर यात बसवण्यात आले आहेत. हिमालयन ४५० मधील कार्यक्षम ब्रेकिंग यंत्रणा यात बसवण्यात आली आहे. गाडीत डिस्क ब्रेक आहेत. तर डुआल एबीएस यंत्रणाही आहे. (Royal Enfield Roadster 450)

(हेही वाचा- Bombay High Court : आम्ही जीव मुठीत घेऊन काम करतोय; असे का म्हणाले उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती?)

रॉयल एनफिल्ड रोडस्टर ४५० बाईक भारतात २०२४ च्या मध्यावर लाँच होईल. आणि या बाईकची स्पर्धा केटीएम ३९० ड्यूक, हस्कवेरना स्वार्टपिलेन ४०१, ट्रायंफ स्पीड ४०० आणि टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० या बाईकशी असेल. या गाडीची अंदाजे किंमत २.४ ते २.६ लाख रुपये इतकी असेल. (Royal Enfield Roadster 450)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.