WPL 2024 : मेरी कोम, करिना कपूरने वाढवली डब्ल्यूपीएल सामन्याची रंगत 

WPL 2024 : दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यानच्या सामन्यात नाणेफेकच करिना कपूरच्या हस्ते झाली

202
WPL 2024 : उद्घाटनाच्या लढतीत मुंबई इंडियन्सची दिल्लीवर शेवटच्या चेंडूवर मात
  • ऋजुता लुकतुके

नवी दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडिअमवर डब्ल्यूपीएल लीगचा दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) असा सामना पार पडला तेव्हा मैदानावर क्रीडा आणि बॉलिवूडमधील ग्लॅमरही अवतरलं होतं. सामनाही चुरशीचा झाला. आणि बंगळुरू संघाने तो एका धावेनं जिंकला. त्याचवेळी मैदानातील हा थरार अनुभवायाला करिना कपूर (Kareena Kapoor) आणि मेरी कोम (Mary Kom) हजर होतया. करिना कपूरच्या हस्ते नाणेफेकही पार पडली. आणि तिच्याबरोबर मेरी कोमही मैदानात हजर होती. (WPL 2024)

(हेही वाचा- Aditi Tatkare : चौथे महिला धोरण महायुती सरकारचे ऐतिहासिक पाऊल)

दोघीही प्युमा कंपनीच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून या सामन्याला हजर होत्या. फक्त या दोघीच नाही तर मसाबा गुप्ता, शुगर कॉस्मेटिक्सची विनिता सिंग आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फे डिसुझा यावेळी हजर होत्या. तिघींनीही सामन्याचा आनंद लुटला. चाहत्यांबरोबर फोटो काढले. आणि स्टँडमधून सेल्फीही घेतली. (WPL 2024)

Insert instagram – https://www.instagram.com/mcmary.kom/?utm_source=ig_embed&ig_rid=24d71ff6-91eb-4b82-a364-52d04988e480

मुष्टीयुद्धात सहावेळा विश्वविजेतेपद पटकावणारी मेरी कोम नंतर या अनुभवाबद्दल इन्स्टाग्रामवरही व्यक्त झाली. महिलांच्या सामन्यासाठी पूर्ण भरलेलं स्टेडिअम आणि प्रेक्षकांमध्ये भारावलेलं वातावरण यामुळे खुश झाल्याचं मेरी कोमने म्हटलं आहे. क्रीडा क्षेत्रातील महिलांचा तिने या संदेशात विशेष गौरव केला. यंदाची डब्ल्यूपीएल प्रेक्षकांचीही गर्दी खेचत आहे. तर क्रिकेटबरोबरच महिलांना आवडणारं मनोरंजनही इथं पाहायला मिळत आहे. (WPL 2024)

(हेही वाचा- CAA Act : सीएएची अंमलबजावणी ही मोदींची आणखी एक हमी – विष्णुदत्त शर्मा)

करिना कपूर आणि मेरी कोमच्या उपस्थितीमुळे खेळ आणि फॅशन, मनोरंजन एकत्र आल्याचं पहायला मिळालं.(WPL 2024)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.