Hariyana : हरियाणा सरकार कोसळले; मुख्यमंत्र्यांसह सगळ्या मंत्र्यांनी दिला राजीनामा

440

लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना हरियाणामध्ये (Hariyana) राजकीय भूकंप झाला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हरियाणातील सत्ताधारी भाजपा व जेजेपी यांच्यातील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत थेट मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिल्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या राजीनाम्यासाठी दोन्ही सत्ताधारी पक्षांमधील लोकसभा निवडणूक जागावाटप कारणीभूत ठरल्याचे बोललं जात आहे.

भाजपा आणि जननायक जनता पार्टी यांची आघाडी तुटली

लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात भाजपा मोठी खेळी खेळणार आहे. हरियाणातील (Hariyana) भाजपा -जननायक जनता पार्टीचे सरकार कोसळण्याच्या स्थितीत आहे. हरियाणा सरकारचे मंत्रिमंडळ सामुहिक राजीनामा देऊ शकते. त्यानंतर हरियाणात पुन्हा नवीन मंत्रिमंडळ बनवण्यात येईल. हरियाणात आता भाजपा आणि जननायक जनता पार्टी यांची आघाडी तुटली असे बोलले जात आहे. हरियाणामध्ये भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी १२ वाजता बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अर्जुन मुंडा आणि तरुण चौक निरिक्षक म्हणून सहभागी होतील. काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांना भेटल्याची बातमी आली होती. यावेळी लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा होणार होती. त्यात जेजीपी भाजपाकडे १ ते २ लोकसभा जागांची मागणी करत होते. याआधीही सोमवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची दुष्यंत चौटाला यांनी भेट घेतली पण निवडणुकीत आघाडीबाबत काही निर्णय झाला नाही. सूत्रांनुसार, भाजपा जेजेपीला जागा सोडण्यास तयार नाही. हरियाणातील (Hariyana) सर्व १० जागांवर भाजपा उमेदवार देणार आहे. परंतु त्यातील एकही जागा मित्रपक्ष जेजेपीला सोडण्यास तयार नाही. त्यातच हरियाणातील अपक्ष आमदार नयन पाल रावत यांनी सांगितले की, मी मुख्यमंत्री खट्टर यांची भेट घेतली. आम्ही आधीपासून मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर आमची चर्चा झाली. जेजेपीसोबतची आघाडी तुटण्याची सुरुवात झाली, असे त्यांनी म्हटले होते.

jgp

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.