लोकसभा निवडणुकाच्या महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghada) जागा वाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीतील नेत्यांसह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासोबत चर्चा देखील झाल्या.मात्र त्यातून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय होऊ शकत नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. सध्या त्यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा- Mumbai Metro 1 : अनिल अंबानींकडून मेट्रो 1 खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी)
पत्रात नक्की काय लिहिले ?
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटलंय की, “आगामी लोकसभा निवडणूक या किंवा पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकते. महाविकास आघाडीने आपापसात जागावाटपाचे समीकरण निश्चित केलेले नाही. मी आघाडीबाबत सकारात्मक आहे परंतु जागावाटपावरून होणारी दिरंगाई चिंतेचा विषय आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस-शिवसेना यांच्यात किमान १० जागा आणि काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीत ५ जागांवर समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी वेळ लागतो,” असेही त्यांनी यातून स्पष्ट केले. (Lok Sabha Election 2024)
“निवडणुकीसाठी कमी कालावधी, काँग्रेस-शिवसेना यांच्यातील असमन्वय आणि महाविकास आघाडीत जागावाटप फॉर्म्युला अंतिम न होणे हे लक्षात घेता मी ९ मार्च रोजी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. तेव्हा शिवसेना कमीत कमी १८ जागा ज्या भाजपासोबत एकत्रित असताना त्यांनी जिंकल्या होत्या, त्या मागत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.” (Lok Sabha Election 2024)
“चेन्नीथला यांची चिंता समजून मी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने एकत्रित बसून ज्या जागा काँग्रेसच्या मनात आणि महाविकास आघाडीत मागणी केल्या त्या सर्व जागांवर चर्चा करावी, असा प्रस्ताव दिला. तेव्हा बाळासाहेब थोरात माझ्याशी संपर्क साधून प्रस्तावावर पुढे चर्चा करतील असं आश्वासन मला देण्यात आले. बाळासाहेब थोरात लवकरच चर्चेसाठी तारीख आणि वेळ ठरवतील. जेणेकरून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मिळून भाजपा-आरएसएसला उद्ध्वस्त करण्यासाठी पुढे जाता येईल,” असंही प्रकाश आंबेडकरांनी पत्रात लिहिले आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community