कुलाबा कॉजवे (Colaba Causeway), ज्यास अधिकृतपणे शहिद भगतसिंग रोड म्हणतात. हा केवळ एक रस्ता नसून अनेक लोकांच्या पोट भरण्याचा मार्ग आहे. कुलाबा आणि ओल्ड वुमन्स आयलॅंडला हा जोडणारा रस्ता आहे. म्हणूनच यास कुलाबा कॉजवे (Colaba Causeway) असे म्हणतात. हे फोर्ट जवळ असून कफ परेडच्या पूर्वेला आहे. जवळच गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहाल पॅलेस आणि टॉवर आहेत.
कुलाबा कॉजवेला (Colaba Causeway) मुंबईचा ‘कल्चर स्क्वेअर’ असे संबोधले जाते. या परिसराची वास्तुकला जुन्या मुंबईची आठवण करून देते. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, रीगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि कुसरो बाग असा वास्तूंमुळे हा परिसर सुंदर दिसतो. ही कलेची नगरी देखील आहे. विशेष म्हणजे शॉपिंग करण्यासाठी हे आदर्श ठिकाण आहे.
कुलाबा कॉजवेमध्ये (Colaba Causeway) कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. पण म्हणतात ना पुरुषांच्या नशिबी छान छान वस्तू खूपच कमी येतात. म्हणून या मार्केटमध्ये विशेषतः मुलींच्या वस्तू अधिक मिळतात. हे अतिशय स्वस्त मार्केट आहे. ’रस्ते का माल सस्ते में’ असं मुंबईत म्हणतात ते उगीच नव्हे.
(हेही वाचा Vasant More : अखेर राज ठाकरेंचा ‘वसंता’ गेला सोडून)
फुट वेअर
या बाजारात तुम्ही स्वस्तात फुट वेअर खरेदी करू शकता. तुम्हाला फॉर्मल शूज स्वस्तात घ्यायचे असतील तर महागड्या शोरूममध्ये पैसे वाया घालवण्याऐवजी कुलाबा कॉजवेमध्ये (Colaba Causeway) या आणि स्वस्तात शॉपिंग करा. कोणत्याही प्रकारच्या सॅंडल्स, शूज इथे तुम्हाल सहज उपलब्ध होतील.
छान छान ज्वेलरी
ज्वेलरी म्हणजे मुलींचा जीव की प्राण! सुंदर दिसायला कोणाला नाही आवडत? आणि ज्वेलरी घालून तर तुमचं सौंदर्य आणखी खुलतं. आजकालच्या फंकी आणि जंक ज्वेलरीचा ट्रेंडनुसार इथे सर्व प्रकारची ज्वेलरी मिळते. त्यामुळे ज्वेलरी घेण्यासाठी उगीच इथे तिथे भटकत बसू नका.
पुस्तके
मित्रांनो, तुम्हाला पुस्तके वाचायला आवडतात का? तर ही जागा तुमच्यासाठी आहे. इथे तुम्हाला हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेतली पुस्तके जवळजवळ अर्ध्या किंमतीत मिळतील. तुम्ही कोणतंही पुस्तक निवडा, तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही.
ट्रेंडी कपडे
कुलाबा कॉजवे (Colaba Causeway) म्हणजे फॅशन आणि ट्रेंडचं माहेतघर. इथे अतिशय सुंदर कपडे मिळतात. कुलाबा कॉजवेमध्ये प्रत्येक रंगाचे, ढंगाचे आणि नवीन डिझाइनचे कपडे मिळतात. हे मार्केट रंगीबेरंगी आणि डिझायनर कुर्ते, प्लाझो, टी-शर्ट आणि डिझायनर ड्रेस घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तर मुलींची रांगच लागलेली असते. इथे तुम्हाला अवघ्या १००- ३०० रुपयांमध्ये चांगले कपडे मिळू शकतात.
मित्रांनो, हा लेख तुम्हाला आवडला ना? आता शॉपिंगसाठी तुम्ही कुलाबा कॉजवे (Colaba Causeway) येथे जाणार ना? तर मंडळींनो… येवा, कुलाबा कॉजवे आपलोच हा…
Join Our WhatsApp Community