भांडुप येथील ड्रीम मॉलमधील आगीच्या घटनेचा चौकशी अहवाल मंगळवारी, 11 मे रोजी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना सादर करण्यात आला. परंतु या चौकशीचा अहवाल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देण्यात आला. पण याची प्रत स्थायी समितीची बैठक सुरु होण्यापूर्वीच पाच मिनिटे आधीच देण्यात आला. त्यामुळे या मुद्यावरून स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली. परंतु या अहवालाची प्रत समिती अध्यक्षांना देण्यात आली नसली, तरी सभागृह नेत्यांना मात्र याची प्रत देण्यात आली आहे. त्यामुळे स्थायी समितीला हा अहवाल न देता सभागृह नेत्यांना परस्पर ही प्रत देवून एकप्रकारे आयुक्तांकडूनच शिवसेनेच्या नेत्यांमध्ये भांडणे लावण्याचा प्रकार सुरु असल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा : …म्हणून मुंबईतील लस जातात परत)
प्रशासनाचा निषेध करत स्थायी समितीची बैठक तहकूब
स्थायी समितीच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ड्रीम मॉलच्या आगीच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल स्थायी समितीला सादर करण्यापूर्वी आधी प्रसारमाध्यमांना दिला आहे. त्यामुळे एकप्रकारे हा स्थायी समितीचा अवमान आहे. याची प्रत ज्याप्रकारे आयुक्तांना सादर केल्यानंतर त्यांच्याकडून तो अध्यक्षांना सादर करायला हवा होता. पंरतु तसे न करता प्रशासनाने या समितीचा अवमान केल्यामुळे याचा निषेध म्हणून झटपट सभा तहकुबीचा प्रस्ताव त्यांनी मांडला. यावर भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी याचा प्राथमिक चौकशी अहवाल यायला दीड महिना लागतो, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या घटनेमध्ये ११ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे याची सखोल चौकशी करून दोषींवर करण्यात यावी, अशी मागणी करत त्यांनी सभा तहकुबीला पाठिंबा दिला. तर सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी याची प्रत आपल्याला मंगळवारीच मिळाली असल्याची माहिती दिली. त्यामुळे अखेर प्रशासनाचा निषेध व्यक्त करत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सभा तहकूब केली
Join Our WhatsApp Community