IPL 2024 : सूर्यकुमार यादव आयपीएलच्या पहिल्या टप्प्याला मुकणार?

IPL 2024 : हार्नियावरील शस्त्रक्रियेनंतर सूर्यकुमार यादव अजून बंगळुरूच्या अकादमीत सराव करत आहे

238
IPL 2024 : सूर्यकुमार यादव आयपीएलच्या पहिल्या टप्प्याला मुकणार?
IPL 2024 : सूर्यकुमार यादव आयपीएलच्या पहिल्या टप्प्याला मुकणार?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा नंबर वन टी-२० फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हार्नियावरील शस्त्रक्रियानंतर सध्या बंगळुरूत क्रिकेट अकादमीत विश्रांती घेत आहे. आणि तो नेमका मैदानात कधी परतू शकेल यावर अजून स्पष्टता नाही. सध्या आयपीएलच्या (IPL) पहिल्या टप्प्यात २२ मार्च ते ७ एप्रिल पर्यंतचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. या पंधरा दिवसांत मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) दोन सामने आहेत. आणि या सामन्यांना सुर्यकुमार खेळू शकेल का याविषयी अजून संघ प्रशासनाने काही सांगितलेलं नाही. (IPL 2024)

(हेही वाचा- Holika Dahan Muhurat : होळी कधी आहे? होलिका दहनाचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत जाणून घ्या)

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २४ मार्चला रविवारी गुजरात टायटन्स या संघाविरुद्‌ध आहे. ‘शस्त्रक्रियेनंतर सूर्यकुमार यादव आता खूप बरा आहे. तो आयपीएल खेळणार हे ही नक्की आहे. पण, पहिला टप्पा तो खेळू शकेल हे क्रिकेट अकादमीतील वैद्यकीय आणि वैद्यकीय- शास्त्रीय पथक काय निर्णय घेतं यावर अवलंबून आहे. पण, पहिले दोन सामने खेळण्याची शक्यता कमीच आहे,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. (IPL 2024)

मुंबई आपला पहिला सामना २२ मार्चला गुजरात टायटन्स विरुद्ध आणि २७ मार्चला सनरायजर्स हैद्राबाद विरुद्ध आहे. हे दोन्ही सामने मुंबई प्रतिस्पर्ध्याच्या मैदानात जाऊन खेळणार आहे. (IPL 2024)

(हेही वाचा- BMC : चहल आता बस्स करा, बॅनरमुक्त मुंबईसाठीही रस्त्यावर उतरा !)

सध्या सूर्यकुमार बंगळुरूमध्ये आपली तंदुरुस्ती वाढवण्यावरच मेहनत घेत आहे. अलीकडे त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले काही व्हीडिओ पाहिले तर त्याच्या तयारीची कल्पना येते. (IPL 2024)

https://www.instagram.com/surya_14kumar/?utm_source=ig_embed&ig_rid=fc942c7f-8454-46d5-923b-7cafab74036f

मुंबईच्या पहिल्या सामन्यासाठी १२ दिवस बाकी असले तरी सुर्यकुमार तोपर्यंत सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल अशी शक्यता कमी आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमारचा दबदबा खूप मोठा आहे. त्याने ६० सामन्यांत आतापर्यंत २ हजारच्या वर धावा केल्या आहेत त्या १७१ धावांच्या स्ट्राईक रेटने. ४ शतकं त्याच्या नावावर आहेत. (IPL 2024)

(हेही वाचा- Holika Dahan Wishes in Hindi : तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना होलिका दहनाच्या कशा शब्दांत द्याल शुभेच्छा?)

आयपीएलनंतर होणाऱ्या टी-२० विश्वचषकातही सूर्यकुमारकडून भारताला मोठ्या आशा आहेत. सूर्यकुमार डिसेंबर २०२३ मध्ये शेवटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. त्याने टी-२० प्रकारात भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. (IPL 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.