Sanjay Raut : मी काय खोटं बोललो ते सांगा! संजय राऊत यांचे आंबेडकर यांना प्रत्युत्तर

221
Sanjay Raut : मी काय खोटं बोललो ते सांगा! संजय राऊत यांचे आंबेडकर यांना प्रत्युत्तर
Sanjay Raut : मी काय खोटं बोललो ते सांगा! संजय राऊत यांचे आंबेडकर यांना प्रत्युत्तर
जागावाटपाची चर्चा समाज माध्यमावर हित नाही, ती काळजी आम्ही घेतो. जागावाटप प्रकरणी मी काय खोटं बोललो ते सांगा, असे प्रत्युत्तर ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना दिले. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. (Sanjay Raut)
महाविकास आघाडीमधील जागावाटपाबाबत बोलतांना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की, ‘जागा वाटपाला विलंब होण्यास वंचित कारणीभूत नाही. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) १० जागांवरून मतभेद आहेत. त्यात पाच जागा अशा आहेत ज्यावर तीनही पक्षात एकमत होत नाही. पाच जागा अशा आहेत ज्यावर एकाचवेळी तीनही पक्षाकडून दावा केला जात आहे. असे असतांना संजय राऊत (Sanjay Raut) माध्यमांना खोटं बोलत आहेत. त्यांचे भांडण संपत नाही, आधी तुमचं मिटवा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. (Sanjay Raut)
यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.जागा वाटपाची चर्चा अथवा महविकास आघाडीच्या चर्चा समाज माध्यमांवर होत नाही. आमच्यामधील कोणतीही चर्चा आम्ही समाज माध्यमांवर व्यक्त करत नाही. मी काय खोटं बोललो हे आंबेडकरांनी सांगावे. आम्हाला प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) साथ हवी आहे, असे राऊत म्हणाले. (Sanjay Raut)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.