देशभरात सर्वाधिक लोकप्रिय आणि मेक इन इंडियाअंतर्गत असलेल्या वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Train) महाराष्ट्रात तयार होत आहे. मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात १८० वंदे भारत रेल्वेगाड्या तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी लातूरमध्ये उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मराठवाड्याचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला हा प्रकल्प देशाला वंदे भारत ट्रेन देण्यासाठी महत्तावाची कामगिरी करणार असून राज्यातील ५६ स्थानकांचे आधुनिकीकरणही करण्यात येणार आहे.
लातूरमध्ये ३६५ एकरांवर मराठवाडा रेल्वे कोच कारखाना उभारण्यात आला आहे. यासाठी मांजरा साखर कारखान्याने आपली १६ एकर जमीन कोच फॅक्टरीसाठी दिली आहे. या कारखान्यात रशियन कंपनीसह भारतीय रेल निगमच्या माध्यमातून बोगी तयार करण्याचे काम चालणार आहे. साधारणत: ५८ हजार कोटी रुपयांचा निधी या कारखान्याला देण्यात आला आहे. या कारखान्यामुळे स्थानिक रोजगाराची संधी निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.
१० वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण
तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी या कारखान्याची संकल्पना मांडत ती पूर्णत्वास नेली. त्यानंतर खासदार सुधाकर शृंगारे, आमदार अभिमन्यू पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या कारखान्यासह देशातील अनेक रेल्वे प्रकल्प आणि १० वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
नवीन योजना सुरू होत आहेत…
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, रेल्वेच्या इतिहासात एवढा मोठा कार्यक्रम कधीच झाला नसेल. १०० वर्षांत पहिल्यांदा असा कार्यक्रम होत आहे. देशातील कानाकोपऱ्यात योजनांचे लोकार्पण केले जात आहे. नवीन योजना सुरू होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community