राजस्थानचे खासदार राहुल कासवा यांच्यासह कॉंग्रेसने मंगळवारी (१२ मार्च) लोकसभेच्या निवडणुकीत ४३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत गौरव गोगोई, नकुलनाथ, वैभव गहलोत यांच्यासह सहा राज्यांतील ४३ उमेदवारांचा समावेश आहे. (Lok Sabha Election)
काँग्रेसचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी पत्रकारांशी बोलताना लोकसभेतील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या दुसऱ्या यादीत सहा राज्यांतील ४३ उमेदवारांचा समावेश आहे. आसाममधील १२, मध्यप्रदेश १०, राजस्थान १०, गुजरात ७, उत्तराखंड ३ आणि दमन आणि दीवमधील एका उमेदवाराच्या नावाचा समावेश आहे. श्रेणीनिहाय विचार करायचा झाला तर ४३ उमेदवारांमध्ये १० सामान्य, १३ OBC, १० SC, ९ ST आणि एक मुस्लिम उमेदवाराचा समावेश आहे. (Lok Sabha Election)
(हेही वाचा – PM Narendra Modi : रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार)
या लोकसभा जागांसाठी नावांची घोषणा
कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल सोमवारी बैठक झाली होती. त्यात ४३ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई आसाममधील जोरहाटमधून निवडणूक लढवणार आहेत. नकुल नाथ मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून निवडणूक लढवणार आहेत. राहुल कासवा राजस्थानमधील चुरूमधून निवडणूक लढवणार आहेत तर वैभव गेहलोत जालोरमधून निवडणूक लढवणार आहेत. (Lok Sabha Election)
यापूर्वी सीईसीची पहिली बैठक ७ मार्च रोजी झाली होती आणि ८ मार्च रोजी ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, मेघालय, नागालँड, सिक्कीम, तेलंगणा आणि त्रिपुरा या लोकसभा जागांसाठी नावांची घोषणा करण्यात आली होती. (Lok Sabha Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community