Indian Army In Maldives: मालदीवमधून भारतीय सैन्याला बाहेर काढण्यास सुरुवात, २५ जवानांनी सोडला देश

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी माहिती दिली होती की, भारत आणि मालदीव यांच्यातील करारानुसार, भारतीय सैनिक १० मेपर्यंत देशात परततील.

301
Indian Army In Maldives: मालदीवमधून भारतीय सैन्याला बाहेर काढण्यास सुरुवात, २५ जवानांनी सोडला देश
Indian Army In Maldives: मालदीवमधून भारतीय सैन्याला बाहेर काढण्यास सुरुवात, २५ जवानांनी सोडला देश

भारताने मालदीवमध्ये (Indian Army In Maldives) उपस्थित असलेल्या आपल्या सैन्याला बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. अड्डू बेटावर उपस्थित असलेले २५ भारतीय सैनिक आतापर्यंत देश सोडून गेले आहेत. मालदीवच्या मिहारू वृत्तपत्रात याविषयी वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

मिहारू वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलाने (MNDF)याबाबत माहिती दिली आहे की, अड्डू बेटावर उपस्थित असलेले २५ भारतीय सैनिक आतापर्यंत देश सोडून गेले आहेत, मात्र भारत किंवा मालदीवकडून अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याआधी २९ मेला भारतीय सैनिकांची जागा घेण्यासाठी २६ तांत्रिक कर्मचाऱ्यांची पहिली तुकडी मलदीवमध्ये पोहोचली होती.

(हेही वाचा – Prakash Ambedkar : काँग्रेसने त्यांचा इगो बाजूला ठेवावा; प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेसवर आरोप)

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी माहिती दिली होती की, भारत आणि मालदीव यांच्यातील करारानुसार, भारतीय सैनिक १० मेपर्यंत देशात परततील. मालदीवमध्ये सध्या असलेल्या भारतीय हेलिकॉप्टरचे नियंत्रण मालदीव लष्कराकडे असेल, अशी घोषणा MNDFने काही दिवसांपूर्वी केली होती. हेलिकॉप्टर चालवणारे क्रूदेखील मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली काम करतील, तर राष्ट्राध्यक्ष मुईज्जू म्हणाले की, १० मेनंतर मालदीवमध्ये एकही भारतीय सैनिक राहणार नाही.

मालदीवमध्ये भारतीय सैनिक काय करत आहेत?
मालदीवमध्ये सुमारे ८८ भारतीय सैनिक आहेत. ते २ हेलिकॉप्टर आणि एका विमानाचे ऑपरेशन हाताळतात. भारतीय हेलिकॉप्टर आणि विमाने मालदीवमधील मानवतावादी मदत आणि वैद्यकीय आपत्कालिन परिस्थितीत तेथील लोकांना मदत करत आहेत. ही कामे हाताळण्यासाठी फक्त तांत्रिक कर्मचारी पाठवण्यात आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही लोक देशात अफवा पसरवत आहेत की भारतीय सैनिक देश सोडत नाहीत. ते फक्त गणवेश बदलत आहेत आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या बहाण्याने साध्या कपड्यात परतत आहेत. या अफवांचे खंडन करताना मुइज्जू म्हणाले, ‘भारतीय सैनिक गणवेशात किंवा साध्या कपड्यांमध्येही देशात राहणार नाहीत. हे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो.’

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.