Lok Sabha Election 2024 : पियूष गोयल उत्तर मुंबईतून भाजपाचे उमेदवार?

289
Lok Sabha Election 2024 : पियूष गोयल उत्तर मुंबईतून भाजपाचे उमेदवार?
Lok Sabha Election 2024 : पियूष गोयल उत्तर मुंबईतून भाजपाचे उमेदवार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे अत्यंत विश्वासू मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांना भाजपा (BJP) उत्तर मुंबईतून निवडणुकीच्या मैदानात उतरविणार असल्याची चर्चा जोरात आहे. महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. असे असले तरी भाजपची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी तयार असल्याची माहिती आहे. (Lok Sabha election 2024)

(हेही वाचा- निवृत्तीनंतरही कामाचा धडाका ठेवणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश Dheerubhai Patel)

खासदारांना तिकीट कापण्याची भीती

लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील बारा ते तेरा विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. अशात कोणत्या खासदाराला उमेदवारी नाकारली जाते आणि त्यांच्याजागी कुणाची वर्णी लागते ही बाब भाजपाची यादी आल्यानंतरच स्पष्ट होईल. (Lok Sabha election 2024)

पियूष गोयल लोकसभेच्या मैदानात

मात्र, केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि राज्यसभेचे खासदार पियूष गोयल (Piyush Goyal) यांना मुंबईमधून लोकसभेवर आणण्याची तयारी भाजपने केली असल्याची चर्चा देशाची राजधानी दिल्लीत रंगली आहे. गोयल लोकसभा लढविणार हे निश्चित असले तरी कोणत्या मतदारसंघातून लढणार? हे स्पष्ट झालेले नाही. (Lok Sabha election 2024)

(हेही वाचा- Shri Ram Mandir : अयोध्येत श्रीरामाचे किती वेळात मिळते दर्शन? स्वतः मंदिर ट्रस्टने दिली माहिती)

उत्तर मुंबई भाजपाचा गड

गोयल यांना उत्तर मुंबईतून तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय आणखी दुस—या मतदारसंघासाठी सुध्दा त्यांचा विचार करण्यात आला होता. परंतु आता त्यांना मुंबईतूनच तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा आहे. गोयल यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळाली तर विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना घरी बसावे लागणार आहे. ते सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार आहेत. ही त्यांची तिसरी टर्म होय. (Lok Sabha election 2024)

गोयल यांच्यासाठी उत्तर मुंबईच का?

दरम्यान, उत्तर मुंबई हा मतदारसंघ भाजपाचा (BJP) गड मानला जातो. मागील दोन निवडणुकांपासून गोपाळ शेट्टी येथून खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत कॉग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा पराभव करून शेट्टी यांनी हा विजय मिळविला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशात लाट होती. (Lok Sabha election 2024)

(हेही वाचा- Maharashtra Transgender Policy 2024 : राज्य सरकारचे तृतीय पंथीयांसाठी धोरण; कोणकोणते मिळणार फायदे?)

1989 ते 1999 या 20 वर्षांच्या काळात झालेल्या लोकसभेच्या पाचही निवडणुकीत राम नाईक यांनी भाजपचे उमेदवार म्हणून येथून विजयी मिळविला होता. यानंतर 2004 मध्ये गोविंदा आणि 2009 मध्ये  संजय निरूपम कॉग्रेसचे खासदार राहिले आहेत. (Lok Sabha election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.