महान संगणक शास्त्रज्ञ प्रदीप कुमार खोसला (Pardeep Kumar Khosla) यांचा जन्म १३ मार्च १९५७ रोजी मुंबईत झाला. खोसला हे हुशार विद्यार्थी म्हणून प्रचलित होते. त्यांनी १९८० मध्ये आयआयटी खरगपूरमधून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी मिळवली. तसेच त्यांनी कार्नेगी मेलॉन विद्यापीठातून एमएस आणि पीएचडी पदवी प्राप्त केली. पुढे १९८६ मध्ये सीएमयू येथे सहाय्यक प्राध्यापक आणि २००८ मध्ये प्राध्यापक म्हणून काम करु लागले.
खोसला हे सर्वाधिक पगार घेणारे कुलपती
२००४ आणि २००९ मध्ये त्यांची सीएमयूच्या डीन पदी नियुक्ती झाली. त्यांनी अनेक विद्यापीठे, समित्या, कॉर्पोरेशन्स आणि सरकारी संस्थांच्या सल्लागार मंडळांवर काम केले आहे. २०१२ मध्ये त्यांची कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन डिएगोचे आठवे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. विशेष म्हणजे कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अध्यक्षांनी या पदावर त्यांची नियुक्ती केली होती. खोसला हे सर्वाधिक पगार घेणारे कुलपती होते. त्यांचा एकूण पगार $१.१४ दशलक्ष झाला. २०११ ते २०१८ या कालावधीत इन्फोसिस पुरस्कारासाठी त्यांनी अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान ज्युरीचे अध्यक्षपद भूषवले होते. खोसला (Pardeep Kumar Khosla) यांनी संशोधन केले आणि त्याद्वारे त्यांनी तीन पुस्तके लिहिली आणि ३५० हून अधिक लेख लिहिले. खोसला यांना १९९९ मध्ये ASEE जॉर्ज वेस्टिंगहाऊस पुरस्कार प्राप्त झाला.
तसेच २००० मध्ये सिलिकॉन-इंडिया लीडरशिप अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन ॲकॅडेमिक्स अँड टेक्नॉलॉजी, २००१ मध्ये IEEE कॉम्प्युटर सोसायटीचा डब्ल्यू. वॉलेस मॅकडोवेल पुरस्कार, २००७ मध्ये बिझनेस सॉफ्टवेअर अलायन्सचा सायबर एज्युकेशन चॅम्पियन अवॉर्ड आणि अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.
Join Our WhatsApp Community