CM Eknath Shinde यांच्या मंत्रालयातील दालनाची पाटी बदलली

राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करत यापुढे व्यक्तीने शासकीय दस्तऐवजावर यापुढे वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे देखील बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

289
CM Eknath Shinde यांच्या मंत्रालयातील दालनाची पाटी बदलली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनाबाहेरील पाटी आता बदलण्यात आलेली आहे. शासनाने वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. (CM Eknath Shinde)

राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करत यापुढे व्यक्तीने शासकीय दस्तऐवजावर यापुढे वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे देखील बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःपासून करायची असे ठरवले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजपासून त्यांच्या मंत्रालयीन दालनाबाहेर लिहिलेल्या नावात बदल करण्यात आला असून ते ‘एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे’ असे करण्यात आले आहे. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Ajit Pawar : अजितदादांच्या पाटीवर आईचे नाव!; महिला धोरणातील तरतुदींची अंमलबजावणी)

माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांचा बरोबरीने आईचा देखील तेवढाच वाटा असतो.. तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. समाजात वडिलांएवढेच आईचे महत्त्व देखील अधोरेखित व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यांची अंमलबजावणी आता मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) स्वतः सुरु केली आहे. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.