काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची मणिपूर ते मुंबई ‘भारत जोडो न्याय यात्रा’ (Bharat Jodo Nyaya Yatra) महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ही यात्रा नंदुरबारमध्ये असतांनाच नंदुरबारमधील (Nandurbar) मोठ्या नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. नंदुरबार येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आदिवासी समाजाचा चेहरा असणारे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राहुल गांधी शहरात असतांनाच पद्माकर वळवी (Padmakar Valvi) यांच्या भाजप प्रवेशामुळे हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
(हेही वाचा – CM Eknath Shinde यांच्या मंत्रालयातील दालनाची पाटी बदलली)
मुंबईमध्ये पार पडला पक्षप्रवेश सोहळा
मुंबईमध्ये पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वळवी यांच्यासोबतच तळोदा काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष तारा बागुल, तसेच त्यांचे पुत्र महेंद्र कलाल यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पद्माकर वळवी यांच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजपला एक नवा चेहरा मिळाला आहे. नुकतेच भाजपावासी झालेले अशोक चव्हाण यांची देखील यावेळी उपस्थिती होती.
नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पद्माकर वळवी (Padmakar Valvi) यांनी काम पाहिले आहे. ते राज्याचे क्रीडामंत्री देखील होते. पद्माकर वळवी यांची मुलगी देखील काँग्रेसमध्ये सक्रिय असून त्या नंदुरबार जिल्हा परिषद मध्ये वर्चस्व असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात वळवी कुटुंबीयांचे वर्चस्व आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community