राज्य सरकारने १३ मार्च रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले असून अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य करत अहमदनगरचे (Ahmednagar) नाव बदलले आहे. अहमदनगर शहराचे नाव ‘अहिल्यानगर’ (Ahilyanagar) करण्याचा राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे, तर पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचेही नाव बदलण्यात आले असून आता या तालुक्याला राजगड असे नाव देण्यात आले आहे.
(हेही वाचा – Captive Market Plan : अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना वितरित साड्या निघाल्या निकृष्ट; सरकारने तक्रारीसाठी दिला नंबर)
चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा निर्णय
या निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आनंद व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “राज्य सरकारचा हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. या निर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.… pic.twitter.com/14r7CLmQMu
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 13, 2024
नामांतरणाची कार्यवाही महसूल विभाग करणार
या संदर्भात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून माहिती मागविण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठराव देखील राज्य शासनास प्राप्त झाला होता. या अनुषंगाने गृह मंत्रालयाच्या (Ministry of Home Affairs) सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येईल. (Ahmednagar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community