मुंबईत अनेक ऍम्युजमेंट पार्क आहे. पण सर्वात जुनं आणि सर्वात प्रचलित मनोरंजन पार्क म्हणजे एस्सेल वर्ल्ड. एस्सेल वर्ल्ड (Essel World Mumbai) आणि वॉटर किंगडम हे आशियातील सर्वात मोठे मनोरंजन पार्क आहे. ६४ एकरमध्ये पसरलेले एस्सेल वर्ल्ड (Essel World Mumbai) सर्व वयोगटातील लोकांना आकर्षित करते. (Essel World Mumbai)
एस्सेल वर्ल्डमध्ये (Essel World Mumbai) तुम्ही तुमचे मित्र आणि कुटुंबासोबत खूप धम्माल करू शकता. मुंबईतील एस्सेल वर्ल्ड (Essel World Mumbai) वेळ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ७.०० अशी आहे आणि शनिवार व रविवारी सकाळी १०.०० ते रात्री ८.०० पर्यंत आहे. हा पार्क गोराई बीच, बोरीवली पश्चिम येथे आहे. एस्सेल वर्ल्ड पार्कची सुरुवात झी ग्रुपचे मालक सुभाष चंद्र यांनी १९८९ मध्ये केली. एस्सेल वर्ल्डमध्ये (Essel World Mumbai) तुम्हाला अनेक प्रकारचे झोपाळे पाहायला मिळतील. येथे सुमारे ७९ वेगात चालणारे आणि रोमांचक अनुभव देणारे झोपाळे आहेत. (Essel World Mumbai)
विशेष म्हणजे प्रत्येक राईड ही अविस्मरणीय आनंद देणारी आहे. हॅपी स्काय, बिग ऍपल, कॅटरपिलर, ज्युनियर डॉजम इत्यादी खेळ मुलं इथे मनसोक्त खेळतात. आइस स्केटिंग, आयएनएस आणि भितीदायक हॉटेल गेम खेळताना एक जबरदस्त थ्रिल निर्माण होतं. या सर्व गोष्टी मुलांना खूप आकर्षित करतात आणि मुलांसोबत मोठे देखील मजा करतात. एस्सेल वर्ल्डमध्ये (Essel World Mumbai) दरवर्षी सुमारे ३० लाख दशलक्ष पर्यटक येतात आणि जीवाची मुंबई करुन जातात. तुम्ही एस्सेल वर्ल्ड पार्कमध्ये प्रवेश करताच, तुम्हाला पहिली गोष्ट दिसेल ती म्हणजे सुपर टेलीकॉमराईड्स… ही राईड म्हणजे खरंच धम्माल आहे. वाचकांनो, या राईडवर बसायला तुम्ही उंची ४.५ फूट असायला हवी. पुढे तुम्ही शॉप अँड ड्रॉप राइडचा अनुभव घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्ही बसून संपूर्ण एस्सेल वर्ल्डचे दर्शन घेऊ शकता. (Essel World Mumbai)
(हेही वाचा – PM Narendra Modi : सेमीकंडक्टरमुळे भारत ग्लोबल हब बनेल)
या राईडवर बसण्यासाठी लागते हिंमत
थंडर राईड, टॉप स्पिन राईड, हुला लूप राईड आणि डिडा रोलरकोस्टर राईड. रोलर कोस्टर राईडवर बसण्यासाठी तुमच्या हिंमत असायला हवी. कारण एकदा का तुम्ही या राईडवर बसलात तर तुमच्या हृदयाचे ठोके जोरजोरात वाजू लागतील. हूला लूप राइड तर एका राक्षसाची स्वारी करण्यासारखे आहे. फन नेट, रोड ट्रेन, क्रेजी कप, जिपर डिपर, हाइवे कारें, रोड ट्रेन, रिकी की रॉकिंग एले, टिल्ट-ए-व्हर्ल, हॉन्टेड हॉटेल अशा खेळांत तुम्ही सहज रमून जाता. (Essel World Mumbai)
बिग ऍपल, ज्युनियर गो कार्टिंग, प्ले पॉट आणि नटराज केटर पिलर असा राईड्सचा आनंद लहान मुलं घेऊ शकतात. मोठमोठ्या राईड्सवर अगदी लहान मुलं बसू शकत नाहीत. म्हणून या राईड्स उत्तम पर्याय आहेत. आता एवढ्या सगळ्या राईड्सवर बसल्यानंतर पेट पूजा तर पाहिजे ना राव… मग एस्सेल वर्ल्डमध्येच (Essel World Mumbai) तुम्हाला हॅप्पी सिंग दा ढाबा, सदर्न ट्रीट, तायपान, डॉमिनोज, मुंबई मसाला सारखी रेस्टॉरंट्स मिळतील, जिथे तुम्ही जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकता. मग एस्सेल वर्ल्डला नक्की जा आणि त्याआधी हा लेख नक्की वाचा, म्हणजे तुम्हाला एस्सेल वर्ल्डची इत्यंभूत माहिती कळेल. (Essel World Mumbai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community