Haffkine ला विधानसभा अध्यक्षांची सदिच्छा भेट; कर्मचाऱ्यांना मिळणार आश्वासित प्रगती योजनेचा लाभ

मागील ४८ वर्षापासून सातत्याने पोलिओ लसीचा भारताच्या लसीकरण मोहिमेस पुरवठा करून भारत पोलिओमुक्त करण्यामध्ये हाफकिन महामंडळाचा सिंहाचा वाटा आहे.

247
Haffkine ला विधानसभा अध्यक्षांची सदिच्छा भेट; कर्मचाऱ्यांना मिळणार आश्वासित प्रगती योजनेचा लाभ

महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत उपक्रम असलेल्या हाफकिन (Haffkine) जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या.), मुंबई या मान्यताप्राप्त संस्थेच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य संरक्षणासाठी उल्लेखनीय योगदान देत असलेल्या एकदंरीत २०० कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ तातडीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी बुधवारी (१३ मार्च) रोजी हाफकिन कर्मचारी वसाहत येथे सदिच्छा भेट दिली आणि “मानवसेवेत समर्पित” हे महामंडळाचे ब्रीद अनुसरणाऱ्या सेवाभावी कर्मचाऱ्यांचा गौरव केला. आश्वासित प्रगती योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत असल्याबाबतची माहिती यावेळी देत पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. (Haffkine)

हाफकिन (Haffkine) महामंडळ हा भारतातील एकमेव सार्वजनिक उपक्रम आहे ज्यास जागतीक आरोग्य संघटना जिनेव्हा, स्वीत्झर्लंड यांचे पोलिओ लसीसाठी मानांकन प्राप्त झालेले आहे ज्यामुळे युनिसेफद्वारे जगातील आशिया, आफ्रिका, लॅटीन (Latin) अमेरिका इत्यादी ४५ देशात पोलिओ लसीची निर्यात महामंडळ करीत आहे. तसेच मागील ४८ वर्षापासून सातत्याने पोलिओ लसीचा भारताच्या लसीकरण मोहिमेस पुरवठा करून भारत पोलिओमुक्त करण्यामध्ये हाफकिन (Haffkine) महामंडळाचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत व्यवसाय म्हणून महाराष्ट्राकरिता ही निश्चितच गौरवाची बाब आहे. (Haffkine)

(हेही वाचा – Cabinet Decision : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय)

संपूर्ण जगात तसेच भारतात कोविड १९ या संसर्गजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव सुरु असताना हाफकिन (Haffkine) महामंडळातील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांनी पुढे सरसावून शासनाद्वारे सोपविण्यात आलेली औषधे तसेच वैद्यकीय उपकरणे इत्यादी महाराष्ट्रभर वितरणाची जबाबदारी पार पाडली. त्यासाठी महामंडळातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या आपल्या कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेत महामंडळातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचे जाहीर करण्यात येत आहे. आश्वासित प्रगती योजनेंतर्गत पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास २०० आहे, त्यांना हा लाभ मिळेल. या निर्णयामुळे तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या सदिच्छाभेटीमुळे हाफकिनच्या कर्मचारीवर्गात आनंद व्यक्त केला जात आहे. हाफकिन कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष नितीन तिर्लोटकर यांनी याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष आणि उपस्थितांचे आभार मानले. (Haffkine)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.