Loksabha Election 2024 : भाजपाची ११ राज्यांतील ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; मनोहरलाल खट्टर यांना कर्नालमधून उमेदवारी

Loksabha Election 2024 : भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती आणि या वेळी पक्षाने 72 उमेदवारांची घोषणा केली. या यादीत 11 राज्यांतील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

244
Loksabha Election 2024 : भाजपाची ११ राज्यांतील ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; मनोहरलाल खट्टर यांना कर्नालमधून उमेदवारी
Loksabha Election 2024 : भाजपाची ११ राज्यांतील ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; मनोहरलाल खट्टर यांना कर्नालमधून उमेदवारी

भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) आज महाराष्ट्रासह 11 राज्यांतील 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पुन्हा नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. नुकतेच राजीनामा दिलेले हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना कर्नालमधून मैदानात उतरवण्यात आले आले. (Loksabha Election 2024)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने बुधवार, 13 मार्च उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यापूर्वी भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती आणि या वेळी पक्षाने 72 उमेदवारांची घोषणा केली. या यादीत 11 राज्यांतील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : नागपूरमधून नितीन गडकरीच, तर बीडमधून पंकजा मुंडेंना उमेदवारी; भाजपाची दुसरी यादी जाहीर)

कोणाला कुठून उमेदवारी ?

हिमाचल प्रदेशचे अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांना हमीरपूरमधून, गडकरींना नागपूरमधून, प्रल्हाद जोशी यांना धारवाडमधून, पियुष गोयल यांना मुंबई उत्तरमधून, शोभा करंदलाजे यांना बंगळुरू उत्तरमधून, तेजस्वी सूर्या यांना बंगळुरू दक्षिणमधून आणि त्रिवेंद्र सिंह रावत यांना हरिद्वारमधून तिकीट देण्यात आले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे मनोहरलाल खट्टर कर्नाल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आम आदमी पक्षाचे (आप) माजी नेते अशोक तंवर हे सिरसा येथून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

अवजड उद्योग राज्यमंत्री किशनपाल गुर्जर फरिदाबादमधून, पंकज मुंडे बीडमधून, राव इंद्रजीत सिंग यादव गुडगावमधून, भारती प्रवीण पवार दिंडोरीमधून, रावसाहेब दादाराव दानवे जालना येथून आणि महाराष्ट्राचे विद्यमान सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमधून निवडणूक लढवतील.

दिल्लीतील ६ खासदार बदलले

म्हैसूरचे खासदार प्रताप सिम्हा, ज्यांचे नाव संसदेच्या सुरक्षा उल्लंघनाच्या घटनेत समोर आले होते, त्यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांची नियुक्ती करण्यात आली.

भाजपने दिल्लीतील आपल्या सात विद्यमान खासदारांपैकी सहा खासदार बदलले आहेत. हर्ष मल्होत्रा पूर्व दिल्ली येथून, तर योगेंद्र चंदोलिया उत्तर पश्चिम दिल्ली येथून निवडणूक लढवतील. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांचे पुत्र नकुलनाथ छिंदवाडा मतदारसंघातून भाजपचे विवेक साहू यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने 11 मार्च रोजी आपली दुसरी बैठक घेतली. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी अंतिम निवड करण्यासाठी अनेक राज्यांमधील संभाव्य उमेदवारांची यादी पाहिली.

पहिल्या यादीत भाजपने 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 195 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र त्यापैकी दोन, भोजपुरी गायक-अभिनेता पवन सिंग आणि उपेंद्र रावत यांनी त्यांच्या निवडीवरून वाद निर्माण झाल्यानंतर माघार घेतली होती. (Loksabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.