Dapoli Krishi Vidyapeeth : दापोली कृषी विद्यापीठ आणि वूल रिसर्च असोशिएशनमध्ये जैविक विघटनक्षम आच्छादन संशोधनासाठी सामंजस्य करार

Dapoli Krishi Vidyapeeth : या सामंजस्य करारांतर्गत विद्यापिठामध्ये जैविकदृष्ट्या विघटन होणाऱ्या आच्छादनाचे कोकणातील विविध विभागामध्ये दापोली, फोंडाघाट, कर्जत व इतर संशोधन केंद्रांवर चाचण्या घेण्यात येणार आहेत.

160
Dapoli Krishi Vidyapeeth : दापोली कृषी विद्यापीठ आणि वूल रिसर्च असोशिएशनमध्ये जैविक विघटनक्षम आच्छादन संशोधनासाठी सामंजस्य करार
Dapoli Krishi Vidyapeeth : दापोली कृषी विद्यापीठ आणि वूल रिसर्च असोशिएशनमध्ये जैविक विघटनक्षम आच्छादन संशोधनासाठी सामंजस्य करार

भारत टेक्स एस्पो २०२४ या नवी दिल्ली येथे टेक्सटाईल मंत्रालयातर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि वूल रिसर्च इन्स्टिट्यूट (Wool Research Institute), ठाणे यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराचा कार्यक्रम नुकताच नवी दिल्ली येथे पार पडला. (Dapoli Krishi Vidyapeeth) विद्यापिठाच्या वतीने महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे, तसेच विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशीद आणि बुल रिसर्चतर्फे के.के. मिश्रा आणि संस्थेच्या सहसंचालिका डॉ. मृणाल चौधरी उपस्थित होते.

(हेही वाचा – Electoral Bond: संकेतस्थळावर निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील जाहीर करणार, मुख्य निवडणूक आयुक्तांचे महत्त्वाचे वक्तव्य)

विद्यापिठामध्ये होणार विविध चाचण्या

या सामंजस्य करारांतर्गत विद्यापिठामध्ये जैविकदृष्ट्या विघटन होणाऱ्या आच्छादनाचे कोकणातील विविध विभागामध्ये दापोली, फोंडाघाट, कर्जत व इतर संशोधन केंद्रांवर चाचण्या घेण्यात येणार आहेत. विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे आणि संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत बोडके, प्रमुख कृषी विद्या विभाग प्रकल्प अंमलबजावणीचे प्रमुख म्हणून काम पहातील. डॉ. कुडतडकर, डॉ. व्ही.एन. शेटवे, डॉ. बी.डी. वाघमोडे व इतर शाखा या उपक्रमात सहभागी होतील. विनायक काशीद यांनी पुढाकार घेऊन हा करार होण्यासाठी समन्वय साधला.

सेंद्रीय शेती (Organic farming), जैविक शेतीचे विविध प्रयोग आणि प्रसार होत असतांना जैविक विघटनक्षम आच्छादन तंत्रज्ञान कोकणातील विविध पिकांसाठी लाभदायक ठरेल, असे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी मत व्यक्त केले. (Dapoli Krishi Vidyapeeth)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.