Cyber Fraud साठी वापरण्यात येणाऱ्या सिम कार्डची किंमत १० हजार रुपये; अशी होत होती विक्री

अजय बिऱ्हाडे हा एका नामांकित मोबाईल कंपनीचा सिम कार्ड एजंट म्हणून सिम कार्डची विक्री करीत होता.

276
Cyber Fraud : एकट्या मुंबईकरांची सात महिन्यांत ६५० कोटींची सायबर लूट

राजस्थानातील सायबर टोळ्यांना मोबाईल सिम कार्डची विक्री करणाऱ्या तरुणाला मुंबईतील वांद्रे पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातून अटक केली आहे. (Cyber Fraud-Mobile Sim card Agant arrested) अजय प्रल्हाद बिऱ्हाडे (२५) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अजय बिऱ्हाडेने राजस्थानमध्ये ४५० मोबाईल सिम कार्ड्स विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Cyber Fraud)

अजय बिऱ्हाडे हा एका नामांकित मोबाईल कंपनीचा सिम कार्ड एजंट म्हणून सिम कार्डची विक्री करीत होता. बिऱ्हाडे हा इतर ग्राहकांची कागदपत्रे वापरून सिम कार्ड एक्टिव्ह करून प्रत्येकी सिम कार्ड १ हजार रुपयांना राजस्थानमधील एजंटला विकत होता, तेथील एजंट सायबर गुन्हेगार टोळ्यांना हे सिम कार्ड्स प्रत्येकी १० हजार रुपयांना विकत होते. अजय बिऱ्हाडे याने मागील एक वर्षात ४५० कार्ड विकल्याची कबुली दिली. (Cyber Fraud)

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : भाजपाची ११ राज्यांतील ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; मनोहरलाल खट्टर यांना कर्नालमधून उमेदवारी)

अशी झाली फसवणूक 

जानेवारी महिन्यात वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सायबर गुन्ह्याचा तपास करीत असताना वांद्रे पोलिस ठाण्याच्या सायबर अधिकाऱ्यांनी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) प्रदान केलेल्या सिम कार्ड ॲक्टिव्हेशन माहितीवरून आरोपीचा माग काढत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून बिऱ्हाडे याला अटक करण्यात आली. वांद्रे येथे राहणारे या गुन्ह्यातील तक्रारदार मुसा शेख (७२) यांना जानेवारी महिन्यात सोशल मीडिया मेसेंजरवर एक मेसेज आला होता, त्या मेसेजमध्ये त्याने स्वतःला सीआयएसएफचा अधिकारी असल्याचे सांगून त्याची बदली पंजाब येथे झाली आहे, आणि त्याला त्याचे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर घरगुती वस्तू विकायच्या आहेत असे सांगण्यात आले, व त्यातून शेख यांची जवळपास दोन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. (Online Cyber Fraud)

शेख यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे, डीसीपी राजतिलक रोशन यांनी वांद्रे पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक संजय मराठे, उपनिरीक्षक शंकर पाटील आणि सायबर टीमचा समावेश असलेल्या टीमचे पर्यवेक्षण केले. त्यांनी ९ मार्च रोजी बिऱ्हाडेचा जळगावपर्यंत माग काढत त्याला अटक करण्यात आली. बिऱ्हाडे याने विकलेल्या सिम कार्डमधून सायबर गुन्हेगारांकडून या प्रकारची फसवणूक करण्यात येत होती. (Cyber Fraud)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.