Albert Einstein: जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ

417
Albert Einstein: जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ
Albert Einstein: जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ

अल्बर्ट आइनस्टाईन (albert einstein) यांना ओळखत नाही, अशी एकही व्यक्ती जगात सापडणार नाही. ते प्रख्यात जगप्रसिद्ध सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांच्या सापेक्षतेच्या सिद्धांतासाठी आणि वस्तुमान-ऊर्जा समीकरण E = mc² साठी ते प्रसिद्ध आहेत. सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील त्यांच्या कार्यासाठी, विशेषतः फोटोइलेक्ट्रिकच्या शोधासाठी त्यांना १९२१ मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

आइनस्टाईन यांचा जन्म १४ मार्च १८७९ रोजी जर्मनीतील वुर्टेमबर्ग येथे एका ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे वडील इंजिनियर आणि सेल्समन होते. आईन्स्टाईन यांना सुरुवातीला बोलण्यात अडचण येत होती आणि ते अभ्यासात फारसे हुशार नव्हते. तरी तुम्ही विचार करत असाल की, ते इतके मोठे शास्त्रज्ञ कसे झाले. वाचकांनो, मोठे लोक सुरुवातीला समाजाच्या दृष्टीने खूप लहान असतात, मात्र त्यांचे मोठेपण कालांतराने झळकते.

(हेही वाचा – Cyber Fraud साठी वापरण्यात येणाऱ्या सिम कार्डची किंमत १० हजार रुपये; अशी होत होती विक्री)

आईन्स्टाईनने त्यांनी आपल्या आयुष्यात शेकडो पुस्तके आणि लेख प्रकाशित केले आहेत. त्यांनी ३०० हून अधिक वैज्ञानिक आणि १५० अशास्त्रीय शोधनिबंध प्रकाशित केले. त्यांनी सापेक्षतेचा सिद्धांत मांडला. आइन्स्टाईन यांनी मांडलेल्या आणि नंतर बरोबर सिद्ध झालेल्या इतर सिद्धांतांमध्ये समरूपता आणि क्वांटम संख्यांच्या असिम्प्टोटिक सामान्यीकरणाचा सिद्धांतदेखील समाविष्ट आहे. आइन्स्टाईन हे जगातील सर्वात प्रसिद्ध वैज्ञानिक बनले. १९१९ मध्ये त्यांच्या सामान्य सापेक्षतेच्या सिद्धांतापासून ते नावारुपाला आले.

आइन्स्टाईन यांना अनेक पुरस्कार मिळाले. ते जणू सिलेब्रिटी म्हणून वावरत होते. त्यांच्या काळचे इतर शास्त्रज्ञ इतके प्रसिद्ध झाले नाहीत. १९२२ मध्ये “सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील त्यांच्या सेवांबद्दल आणि विशेषतः फोटोइलेक्ट्रिक प्रभावाच्या सिद्धांताच्या शोधासाठी” त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्याचबरोबर त्यांना इतर अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.