राज्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक दि चेन अंतर्गत सुरू असलेले कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे निर्बंध आता 1 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहेत. याबाबत राज्य शासनाकडून परिपत्रक काढून माहिती देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री लॉकडाऊनसाठी आग्रही
राज्यातील लॉकडाऊन वाढवल्याने त्याचा रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात फायदा होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्य शासनाने 1 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवल्याचे समजते. सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढलेली रुग्ण संख्या आता नियंत्रणात येऊ लागली आहे. लॉकडाऊनमुळे हे शक्य झाले असल्याचे बुधवारी, ११ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील मंत्र्यांचा सूर होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जूनपर्यंत वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत राज्य शासनाने एक परिपत्रक काढून त्याबाबतची नियमावली जाहीर केली आहे.
असे असणार नियम
- परराज्यातून महाराष्ट्रात येणा-यांना 48 तासांच्या आधीचा RTPCR रिपोर्ट सोबत ठेवणे बंधनकारक.
- महाराष्ट्राने घोषित केलेल्या संवेदनशील राज्यांतून येणा-या प्रवाशांना RTPCR रिपोर्ट सोबत ठेवणे बंधनकारक.
- परराज्यातून मालवाहूतक करणा-यांचा RTPCR रिपोर्ट निगेटिव्ह असावा. हा रिपोर्ट 7 दिवस ग्राह्य धरला जाईल.
- मालवाहतूक ट्रक मध्ये केवळ एक ड्रायव्हर आणि एका क्लिनरलाचं परवानगी असेल.
🚨Strict restrictions under #BreakTheChain extended till 1st June 2021🚨 pic.twitter.com/QxEmW77ZlV
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 13, 2021
- बाजारपेठांमध्ये गर्दी वाढल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाने त्या बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घ्यावा.
- दूधाच कलेक्शन, वाहतूक आणि प्रकिया यांना परवानगी असणार.
- एअरपोर्ट आणि बंदरावर काम करणा-या कर्मचा-यांना लोकल मेट्रो आणि मेट्रो मध्ये प्रवासाची परवनागी असेल.