गाढ झोपेसाठी करा 'हे' सोपे उपाय !

रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. व्यायाम आणि आहारासोबतच पुरेशी झोप उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे काही सोपे उपाय केल्यास गाढ झोप लागण्यास मदत होऊ शकते.

झोपेची वेळ ठरवा झोपेचे नियमित वेळापत्रक ठरवणे महत्त्वाचे आहे. दररोज झोपण्याची नियमित वेळ ठरवा. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. शरीराचे अंतर्गत जैविक घड्याळ उत्तमरित्या काम करते. 

झोपण्याआधी ध्यान आवश्यक रात्री झोपण्यापूर्वी ध्यान आणि योगासने करा. यामुळे मन:शांती आणि आनंद मिळेल. शांत झोप लागण्यास मदत होईल.

झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिणे कोमट पाणी प्यायल्याने शारीरिक ताण कमी होतो. झोपेची गुणवत्ता सुधारते. कोमट दूधदेखील पिऊ शकता.

झोपण्याच्या जागी गोंगाट नसावा मंद आवाजात मंत्र, एखादे संगीत, गाणी ऐकू शकता. यामुळे गाढ आणि शांत झोप लागण्यास मदत होऊ शकते. 

डिजिटल उपकरणांपासून दूर राहा  झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल, टॅबलेट, टीव्ही आणि कॉम्प्युटर वापरणं बंद करा. या उपकरणांमधील युव्ही किरणांचा झोपेच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे झोप लागण्यासही विलंब होतो.