Indu Malhotra: न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दुसर्‍या वरिष्ठ वकील !

इंदू मल्होत्रा यांचा जन्म १४ मार्च १९५६ रोजी बंगळुरू येथे झाला. त्यांनी नवी दिल्लीच्या कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमधून बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स) आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले.

223
Indu Malhotra: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून पदोन्नती झालेल्या पहिल्या महिला वकील कोण आहेत? वाचा सविस्तर ...
Indu Malhotra: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून पदोन्नती झालेल्या पहिल्या महिला वकील कोण आहेत? वाचा सविस्तर ...

इंदू मल्होत्रा (Indu Malhotra) या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश आणि वरिष्ठ वकील आहेत. सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केलेल्या त्या दुसऱ्या महिला होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव ओम प्रकाश मल्होत्रा. त्यांचे वडील सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आणि सुप्रसिद्ध लेखक होते.

इंदू मल्होत्रा यांचा जन्म १४ मार्च १९५६ रोजी बंगळुरू येथे झाला. त्यांनी नवी दिल्लीच्या कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमधून बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स) आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर, त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस ऍंड विवेकानंद कॉलेजमधून राज्यशास्त्रात लेक्चरर म्हणून काम केले. १९८२ मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लॉ फॅकल्टीच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून कायद्याची पदवी पूर्ण केली.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : गोपाळ शेट्टींना हॅटट्रिक करण्याची संधी मिळाली नाही, आता राज्यातील राजकारणात उतरवणार?)

१९८३ मध्ये त्या कायद्याच्या व्यवसायात आल्या. सुप्रीम कोर्टात ३० वर्षे कायदेशीर सल्लागार म्हणून काम केल्यानंतर, मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून पदोन्नती झालेल्या त्या पहिल्या महिला वकील होत्या. इंदू मल्होत्रा १३ मार्च २०२१ रोजी निवृत्त झाल्या. विशेष म्हणजे त्यांनी द लॉ ऍंड प्रॅक्टिस ऑफ आर्बिट्रेशन ऍंड कॉन्सिलिएशनची तिसरी आवृत्तीदेखील लिहिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.