Neelam Gorhe : स्त्रियांचा सन्मान म्हणजेच स्त्रीचा अधिकार – नीलम गोऱ्हे

173
Neelam Gorhe : स्त्रियांचा सन्मान म्हणजेच स्त्रीचा अधिकार - नीलम गोऱ्हे
Neelam Gorhe : स्त्रियांचा सन्मान म्हणजेच स्त्रीचा अधिकार - नीलम गोऱ्हे

स्त्रियांचा सन्मान म्हणजेच स्त्रीचा अधिकार आहे. शिवसेना महिला पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महिलांच्या सक्षमीकरण करण्याबाबत ज्या विविध योजना सुरू केल्या आहेत, त्याची माहिती स्थानिक महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी काम करा, असे आवाहन शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. त्या छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी येथील महिला पदाधिकारी बैठकीत त्या बोलत होत्या. (Neelam Gorhe)

(हेही वाचा- Amit Shah : CAA मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही)

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, निवडणुकीत महिलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला. (Neelam Gorhe)

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या महिलांची संख्या राजकारणात तसेच समाजकारणात वाढताना दिसत आहे. महिलांचे निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शिवसेना महिला आघाडीने पुढाकार घेऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले. त्याचप्रमाणे दुष्काळात रोजगार हमी योजनेचे कामे सुरू होतील. यासंदर्भात आपण ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांना रोहयोच्या कामाची व शासन निर्णयाची माहीती देखील देण्याचे सूचना डॉ.गोऱ्हे यांनी महिला पदाधिकारी यांना केली. (Neelam Gorhe)

(हेही वाचा- Election Bonds : निवडणूक रोख्यांच्या आकडेवारीचा तपशील ‘वेळेवर’ जाहीर केला जाईल – मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार)

यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील महिला पदाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून विचारपूस देखील केली. (Neelam Gorhe)

यावेळी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, महिला संपर्कसंघटक सविता केवेंडे यांनी या बैठकीत काही मुद्दे मांडले. तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी येथील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या (Neelam Gorhe)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.