मुंबई संघाने तब्बल ४२व्यांदा रणजी करंडक (Ranji Trophy Final) जिंकले आहे. रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला. अंतिम सामन्यात मुंबईने सुरुवातीपासूनच विदर्भावर वर्चस्व गाजवले. मुंबईने विदर्भासाठी ५३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भ चौथ्या डावात ३६८ धावांवर बाद झाला.
(हेही वाचा – Paytm Fastag Recharge : पेटीएम युजर्स १५ मार्चनंतर फास्टॅग रिचार्ज करू शकणार नाहीत; आजच आपलं वॉलेट करा शिफ्ट)
तब्बल ८ वर्षांनंतर मुंबईने जिंकली रणजी ट्रॉफी :
मुंबईने ८ वर्षांनंतर रणजी ट्रॉफी (Ranji Trophy Final) जिंकली आहे. यापूर्वी मुंबईने २०१५ – २०१६ मध्ये रणजी करंडक जिंकला होता. दुसऱ्या डावात विदर्भ ४ बाद १३३ धावांवर असताना करुण नायर आणि कर्णधार अक्षय वाडकर यांनी पाचव्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी करत सामना रंगवला.
रणजी ट्रॉफीवर मुंबईने ४२व्यांदा कोरले आपले नाव; मुंबईचा विदर्भावर १६९ धावांनी विजय
.
.
.#hindusthanpostmarathi #marathinews #breaking #trending #maharashtra #RanjiTrophyFinal #MUMvsVID #Mumbai #vidarbha pic.twitter.com/dzuhXccGWf— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) March 14, 2024
(हेही वाचा – BMC : शुक्रवारी स्थायी समितीची बैठक, राहुल शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार सभा)
विदर्भ संघाने हार मानली नाही :
मुशीर खानने करुण नायरला ७४ धावांवर बाद करून विदर्भाला पाचवा धक्का दिला. मात्र, करुण नायर बाद झाल्यानंतरही विदर्भ संघाने हार मानली नाही आणि संघर्ष सुरूच ठेवला. कर्णधार अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे यांनी सहाव्या विकेटसाठी १३० धावा जोडल्या. मात्र, तनुश कोटियनने कर्णधार अक्षय वाडकरला (१०२) बाद करून विदर्भाला मोठा धक्का दिला. (Ranji Trophy Final)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community