Veer Savarkar : पवई येथे रणजित सावरकर आणि आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते सावरकर स्मारकाचे लोकार्पण

Veer Savarkar : जेव्हा निवडणूक (Loksabha Election 2024) येईल, तेव्हा जो हिंदूहितासाठी काम करेल, अशाच उमेदवाराला मत द्या. हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा, असे आवाहन रणजित सावरकर यांनी केले आहे.

167
Veer Savarkar : पवई येथे रणजित सावरकर आणि आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते सावरकर स्मारकाचे लोकार्पण
Veer Savarkar : पवई येथे रणजित सावरकर आणि आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते सावरकर स्मारकाचे लोकार्पण

छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जन्मले होते, तेव्हाही आपला समाज विभागलेला होता. महाराजांनी जे सर्वांत पहिले काम केले, ते म्हणजे १८ पगड जातीच्या हिंदूंना सोबत आणले. त्यानंतर हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी जे तेजस्वी बलीदान दिले, त्यांनी जे हौतात्म्य स्वीकारले, त्या क्षणी संपूर्ण महाराष्ट्रात स्वदेश आणि स्वधर्माची स्थापना झाली. ब्रिटिशांच्या काळात जी जातीभेदाची चळवळ सुरु झाली, ती मात्र आजपर्यंत चालूच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना (Veer Savarkar) जशा प्रकारे अपेक्षित होता, तशा प्रकारे हिंदू समाज आपल्याला संघटित करायचा आहे. आज तुमच्याकडे एक शस्त्र आहे, ते म्हणजे तुमचे मत. जेव्हा निवडणूक (Loksabha Election 2024) येईल, तेव्हा जो हिंदूहितासाठी काम करेल, अशाच उमेदवाराला मत द्या. मतदानासाठी उपस्थित रहा. हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी केले.

(हेही वाचा – BMC : शुक्रवारी स्थायी समितीची बैठक, राहुल शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार सभा)

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती स्थळाचे सुशोभीकरण

आमदार दिलीप लांडे यांच्या पुढाकाराने पवई येथील विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोड वरील भव्य आणि सुसज्ज स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती स्थळाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मंगळवार, १२ मार्च रोजी पवई येथे त्याचा लोकार्पण सोहळा रणजित सावरकर आणि शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांच्या हस्ते संपन्न झाला. त्या सोहळ्याला रणजित सावरकर संबोधित करत होते. या वेळी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

हिंदूंनी जात-पात विसरून संघटित होण्याची आवश्यकता

या वेळी रणजित सावरकर पुढे म्हणाले की, स्मारके ही फक्त नमस्कार करण्यासाठी नसतात, तर ती त्या व्यक्तीचे विचार आत्मसात करण्यासाठी आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी असतात. सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हा जो ग्रंथ लिहिला, त्याला १०१ वर्षे झाली आहेत. त्यांनी १९२३ साली रत्नागिरीच्या कारागृहात बंद असताना हा ग्रंथ लिहिला आहे. त्या वेळी खिलाफत चळवळ चालू होती; पण त्या चळवळीचा भारताशी काही संबंध नव्हता. ही धार्मिक भावना वापरून राजकारण करायची ही पहिली वेळ होती.

त्या वेळी भारतात हिंदूंची लोकसंख्या होती ७५ टक्के होती. नंतरच्या काळात हिंदू समाज जाती-पातींमध्ये विभागला गेल्यामुळे हिंदू लोकसंख्येचे प्रमाण ६० टक्के झाले. १०० वर्षांपूर्वी देशात जी परिस्थिती होती, ती स्थिती आज पुन्हा निर्माण झाली आहे. हिंदूंची संख्या ७५ टक्क्यांवर आली आहे. आता हिंदूंनी जात-पात विसरून पुन्हा संघटित होण्याची आवश्यकता आहे. (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.