अश्लील चित्रपट दाखवणाऱ्या १८ OTT Apps वर केंद्र सरकारने घातली बंदी

माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या तरतुदीनुसार ही बंदी घालण्यात आली आहे.

358

सध्या केंद्र सरकार सोशल मीडिया आणि ऑनलाईन मीडियावर जागरूकतेने लक्ष घालत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अश्लील चित्रपट दाखवणाऱ्या १८ OTT Apps वर केंद्र सरकारने बंदी घातली. तसेच काही सोशल मीडिया अकाऊंटसही बंद केले. या व्यतिरिक्त १९ संकेतस्थळ, १० ॲप्स (गुगल प्ले स्टोअरवरील सात आणि ॲपल स्टोअरवरील तीन) आणि ५७ सोशल मीडिया अकाऊंटला बंद करण्यात आले आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयानंतर सांगितले की, अभिव्यक्तीच्या नावाखाली OTT Apps मधून अश्लीलतेचा प्रचार केला जाता कामा नये. माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या तरतुदीनुसार ही बंदी घालण्यात आली आहे. यासाठी इतर खात्याचे मंत्री आणि सरकारच्या विभागांचे मत जाणून घेण्यात आले. तसेच माध्यम आणि करमणूक क्षेत्र, महिला आणि बाल अधिकारासाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांचीही मते जाणून घेण्यात आली.

(हेही वाचा Election Commission : ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त)

कोणत्या OTT Apps वर घातली बंदी? 

  • ड्रिम्स फिल्म्स
  • वुव्ही
  • येस्समा
  • अनकट अड्डा
  • ट्री फ्लिक्स
  • एक्स प्राइम
  • निऑन एक्स व्हिआयपी
  • बेशरम्स
  • हंटर्स
  • रॅबिट
  • एक्स्ट्रामुड
  • न्यूफ्लिक्स
  • मूडएक्स
  • मोजफ्लिक्स
  • हॉट शॉट्स व्हिआयपी
  • फुगी
  • चिकुफ्लिक्स
  • प्राइम प्ले

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.