Indrayani River : इंद्रायणी झाली प्रदूषित; शेकडो मृत माशांचा खच

158
पुण्यातील देहूगावातील इंद्रायणी नदीत (Indrayani River) पुन्हा शेकडो मासे मृत झाले आहेत. अवघ्या तेरा दिवसांवर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येऊन ठेपला आहे. अशा स्थितीत इंद्रायणी नदी प्रदूषित होणे ही चिंतेची बाब समजली जात आहे.
या पालखी सोहळ्याला देहूमध्ये राज्यभरातून लाखो वारकरी दाखल होतात. या वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करतात. मात्र या इंद्रायणी नदीतील जीवजंतू यांचा श्वास गुदमरतोय परिणामी वारंवार या इंद्रायणी नदीतील (Indrayani River) मासे मृत पडत आहे. आठ दिवसातील ही दुसरी घटना आहे. शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याने या माशांचा खच इंद्रायणी नदीच्या डोहात तरंगत होता. तसेच देहूतील पर्यावरणप्रेमींनी देहू नगर पंचायत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आणि हे मृत मासे एकत्र करून त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.