महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी व कर्मचारी कल्याण केंद्र यांच्या वतीने विधान भवन क्रिकेट प्रीमियर लीग २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये MLS Desirers-A हा विजेता संघ ठरला.
या स्पर्धेमध्ये एकूण 14 संघांनी सहभाग घेतला होता. तसेच 200 च्या वर खेळाडू मैदानात उतरले होते. 6 मार्च व 7 मार्च 2024 हे दोन दिवस ओव्हल मैदानात क्रिकेटचा थरार रंगला होता. या स्पर्धेच्या ठिकाणी सचिव (१)(का.) जितेंद्र भोळे, सचिव (२) (का.) डॉ. विलास आठवले, सहसचिव शिवदर्शन साठे, उपसचिव (विधी) श्रीमती सायली कांबळी, अवर सचिव कोमटवार, कार्यवाही संपादक अजय अग्रवाल, कक्ष अधिकारी प्रकाश थिटे या मान्यवरांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून भेट दिली.
(हेही वाचा Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफीवर मुंबईने ४२व्यांदा कोरले आपले नाव)
स्पर्धेचा निकाल
- विजेता संघ – MLS Desirers-A (कर्णधार – मकरंद पाटील)
- उप विजेता संघ – Panthar XI-A (कर्णधार – सतीश आसकट)
- मालिकावीर – शैलेश शेडगे (संघ – Panthar XI-A)
- उत्कृष्ट गोलंदाज – किरण गायकर (संघ – Panthar XI-A)
- उत्कृष्ट फलंदाज – तुषार बचाटे (संघ – MLS Desire-A)
Join Our WhatsApp Community