North West Lok Sabha Constituency : भाजपा कुणाला देणार उमेदवारी?

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघ आणि ठाणे लोकसभा मतदार संघांची अदलाबदल ही शिवसेना आणि भाजपामध्ये झाल्याचे बोलले जात आहे.

486
North West Lok Sabha Constituency : भाजपा कुणाला देणार उमेदवारी?
North West Lok Sabha Constituency : भाजपा कुणाला देणार उमेदवारी?

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाची (North West Lok Sabha Constituency) जवळपास अदलाबदल निश्चित झाल्याने या मतदार संघातून भाजपाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या मतदार संघातून आमदार अमित साटम, आमदार अतुल भातखळकर, जयप्रकाश ठाकूर आणि संजय उपाध्याय यांची नार्वे चर्चेत आहे. मात्र, उत्तर मुंबईतून तिकीट कापल्या गेलेल्या गोपाळ शेट्टी यांचे पुनर्वसन केले जाण्याची शक्यताही अधिक वर्तवली जात आहे. (North West Lok Sabha Constituency)

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघ (North West Lok Sabha Constituency) आणि ठाणे लोकसभा मतदार संघांची अदलाबदल ही शिवसेना आणि भाजपामध्ये झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी निवडणूक लढवण्याची शक्यता मावळली. याच मतदार संघातून शिवसेना उबाठा गटाकडून किर्तीकर यांचे पुत्र अमोल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे या मतदार संघातून अमोल किर्तीकर हे निवडणूक लढवणार असून शिवसेनेचा दावा संपुष्टात येणार असल्याने गजानन किर्तीकर हे पुन्हा निवडणुकीला उमे राहण्याची शक्यताच मावळली आहे. मात्र, हा मतदार संघ भाजपाच्या वाट्याला जात असल्याने या भाजपा कुणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (North West Lok Sabha Constituency)

भाजपाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे (North West Lok Sabha Constituency) प्रभारी हे अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार अमित साटम हे आहे. अमित साटम यांच्या सोबतच गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर यांचे पती आणि भाजपाचे निष्ठावान पदाधिकारी जयप्रकाश ठाकूर यांच्यासह उत्तर भारतीय नेते संजय उपाध्याय यांचीही नावे चर्चेत आहेत. यासह कांदिवलीतील आमदार अतुल भातखळकर यांचेही नाव आता पुढे आले असून उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कापून पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शेट्टी यांना उत्तर पश्चिम मतदार संघातून निवडणूक मतदार संघात उतरवण्याचा पर्याय असल्याचे बोलले जात आहे. शेट्टी यांचा पत्ता कापला गेल्याने एकप्रकारे उत्तर मुंबईतील भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरलेली आहे. पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, भाजपाचे मुंबई अध्यक्षपद आणि खासदार अशाप्रकारची पदे भुषवणाऱ्या शेट्टी यांच्यासाठी उत्तर पश्चिम मतदार संघ अनोळखी नसून ते चांगल्याप्रकारे तिथे बांधणी करू शकतात असेही बोलले जात आहे. (North West Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत वापरणार ‘ही’ शाई)

चर्चेत असलेल्या संभाव्य उमेदवारांची वैशिष्ट्ये

उत्तर पश्चिम मुंबई भाजप प्रभारी अमित साटम :
  • अंधेरी पश्चिममधील विद्यमान आमदार
  • यापूर्वी अंधेरी पश्चिम येथील नगरसेवक राहिलेले आहेत
  • आक्रमक असे त्यांचे व्यक्तिमत्व
  • विरोधी पक्षात असताना मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर सातत्याने आवाज उठवला
  • भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून महापालिका आयुक्त चहल आणि अधिकारी, आदित्य ठाकरे, शिवसेनेवर आरोप करत त्यांना बेहाल केले होते
  • अभ्यासू वृत्ती पण स्वत:च्या भूमिकेवर ठाम (North West Lok Sabha Constituency)
जयप्रकाश ठाकूर :
  • माजी मंत्री व आमदार विद्या ठाकूर यांचे पती
  • भाजपाचे पदाधिकारी
  • अत्यंत शांत व्यक्तिमत्व आणि विषयांची जाण असलेला
  • बायको आमदार आणि मुलगा माजी नगरसेवक
  • गोरेगाव विधानसभा क्षेत्रात चांगल्याप्रकारे काम
  • या मतदार संघातील उत्तर भारतीय मते अधिक असल्याने त्यांना फायदा होण्याची शक्यता (North West Lok Sabha Constituency)
संजय उपाध्याय
  • मागील राज्य सभेवरील जागेसाठी त्यांच्या नावाची चर्चा होती
  • राम भक्त
  • अभ्यास वृत्ती आणि चांगले वक्तृत्व
  • उत्तर भारतीय नेता म्हणून ओळख
  • उत्तर भारतीय मतांचा अधिक फायदा होण्याची शक्यता (North West Lok Sabha Constituency)
आमदार अतुल भातखळकर
  • भाजपाचे कांदिवलीतील विद्यमान आमदार
  • पक्षाचे प्रवक्ते
  • सर्वांशी मिळून मिसळून राहणे
  • प्रत्येक विषयांचा दांडगा अभ्यास आणि प्रभावी वक्तृत्व
  • अडचणीच्या वेळी पक्षांची भूमिका मांडण्यासाठी पुढाकार (North West Lok Sabha Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.