Water Cut : मुंबईत पुढचे ४० दिवस ५ टक्के पाणी कपात

भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगरपालिकेच्‍या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. आशिया खंडातील हे सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे.

8151
Water Cut : मुंबईत गुरुवार आणि शुक्रवारी ५ ते १० टक्के पाणीकपात 

मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून भांडूप जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाली संदर्भातील कामे सुरु आहेत. या कामांमुळे २४ एप्रिल २०२४ पर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ५ टक्के पाणी कपात (Water Cut) केली जाणार आहे. (Water Cut)

भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगरपालिकेच्‍या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. आशिया खंडातील हे सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे. भांडूप संकुल येथे १ हजार ९१० दशलक्ष लीटर आणि ९०० दशलक्ष लीटर पाणी शुद्धीकरण करणारी दोन युनिट्स आहेत. त्‍या पैकी ९०० दशलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राद्वारे प्रतिदिन ९९० दशलक्ष लीटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. (Water Cut)

(हेही वाचा – Agniveer Recruitment : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांतील उमेदवार करू शकतात अर्ज)

९०० दशलक्ष लीटर क्षमतेच्‍या या जलशुद्धीकरण केंद्रातील मोठ्या जलशुद्धीकरण प्रक्रिया टाक्या स्वच्छ करण्याची पावसाळ्यापूर्वीची देखभाली संदर्भातील कार्यवाही सध्‍या हाती घेण्‍यात आली आहे. यामुळे २४ एप्रिल २०२४ पर्यंत महानगरपालिकेच्यावतीने संपूर्ण मुंबईसाठी होणाऱ्या एकूण पाणीपुरवठ्यात ५ टक्के पाणी कपात (Water Cut) करण्‍यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून व कटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. (Water Cut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.