मागील ३-४ महिन्यांपूर्वी रश्मी सामंत या तरुणीचे नावे बरेच चर्चेत आले होते. आपल्या महत्त्वाकांक्षेच्या जोरावर रश्मी पद्व्युत्तर शिक्षणासाठी इंग्लंडस्थिती ऑक्सफोर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवला. नेतृत्वगुणाच्या जोरावर अल्पावधीत तेथील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली, मात्र विद्यापीठाच्या फॅकल्टी मेंबर डॉ. अभिजीत सरकार या हिंदुद्वेष्ट्याने रश्मीची सोशल मीडियाद्वारे बदनामी केली. त्यानंतर आता या महाभागाने अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविषयी अश्लील भाष्य सोशल मीडियातून केले. त्यामुळे आता डॉ. सरकार यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी ऑक्सफोर्डसह इंग्लंडमधील विविध विद्यापीठांमधील हिंदू विद्यार्थी एकवटले आहेत.
रश्मीची केलेली बदनामी!
डॉ. अभिजीत सरकार यांना हिंदूफोबिया झाला आहे. त्यामुळे त्यांनी ऑक्सफोर्डमधील पहिली भारतीय महिला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आलेली रश्मी सामंत हिच्या विरोधात डॉ. सरकार यांनी सोशल मीडियातून रश्मीच्या विरोधात अपप्रचार सुरु केला होता. तिच्या आई-वडिलांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल केले, तसेच त्यांची विटंबना करण्यात आली. त्याला कंटाळून रश्मीने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियनच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन रश्मी भारतात परतली.
We are proud to stand with the Hindu voices on campus who are raising awareness and urging Oxford to investigate. A diverse coalition of Hindus are standing together today. #HindusAgainstHate
— Hindu On Campus (@hinduoncampus) May 12, 2021
कंगणा राणावत हिच्यावरही अश्लील भाष्य!
आता डॉ. सरकार यांनी प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरुद्ध अश्लील भाष्य केले. त्यामुळे डॉ. अभिजीत सरकार यांची चौकशी करण्यात यावी, त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टची चौकशी करण्यात यावी, तसेच जोवर चौकशी पूर्ण होत नाही तोवर त्याला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठ डॉ. सरकार यांच्यावर कारवाई करण्यात अपयशी ठरेल आहे.
(हेही वाचा : ऑक्सफर्ड विद्यापीठात हिंदुद्वेष, विद्यार्थी नेत्या रश्मी सामंतची मानसिक छळवणूक!)
कर्नाटक मुख्यमंत्र्यांचे पत्र!
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाला पत्र लिहिले आहे. रश्मी सामंत हीच झालेल्या मानसिक छळवणुकीच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी कारणीभूत अभिजीत सरकार दोषी ठरवावे, असेही मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले.
Join Our WhatsApp Community