देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) प्रतिलिटर २ रुपयांनी कपात जाहीर करण्यात आली आहे. ही कपात आजपासून म्हणजेच शुक्रवार १५ मार्च पासून सकाळी ६ वाजेपासून लागू लागू झाली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.
(हेही वाचा – Female Infanticide : स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ)
आपल्या ट्विटर संदेशात पुरी म्हणाले की,
“पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) किमतीत २ रुपयांनी कपात करुन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, कोट्यवधी कुटुंबाचे कल्याण हे त्यांचे ध्येय आहे. जग कठीण काळातून जात असताना विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पेट्रोलचे दर ५० ते ७२ टक्क्यांनी वाढले होते. आपल्या शेजारील अनेक देशांमध्ये तर पेट्रोल उपलब्ध नव्हते. १९७३ नंतर पहिल्यांदाच इंधनाचे सर्वात मोठे संकट असूनही पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे देशावर त्याचा परिणाम झाला नाही. भारतातील पेट्रोलचे दर वाढण्याऐवजी गेल्या अडीच वर्षांत ४.६५ टक्क्यांनी कमी झाले. जग कठीण काळातून जात असताना विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पेट्रोलच्या (Petrol Diesel Price) किमती ५०-७२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, आपल्या शेजारील देशांमध्ये आता पेट्रोल उपलब्ध नाही. गेल्या ५० वर्षातील सर्वात मोठे तेल संकट असूनही, पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे मोदींच्या परिवारावर परिणाम झाला नाही. भारतातील पेट्रोलचे दर वाढण्याऐवजी गेल्या अडीच वर्षांत ४.६५ टक्क्यांनी कमी झाल्याचे पुरी यांनी नमूद केले.” (Petrol Diesel Price)
(हेही वाचा – Supreme Court : लहान मुलांचे अश्लील चित्रपट पाहणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा कडक इशारा)
३९ देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी :
भारत हा एकमेव देश होता जिथे पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) किमती वाढल्या नाहीत, मात्र कमी झाल्या. आम्ही आमच्या देशवासियांसाठी जमेल तिथून तेल विकत घेतले. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी आपण २७ देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी करायचो, परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली आपण आपल्या देशवासीयांना स्वस्त पेट्रोल, डिझेल आणि गॅस उपलब्ध करुन देण्यासाठी ही व्याप्ती वाढवली आणि आता गरजा भागवण्यासाठी आपण ३९ देशांकडून खरेदी करत आहोत. तसेच पंतप्रधान मोदींनी नोव्हेंबर २०२१ आणि मे २०२२ मध्ये दोन वेळा पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol Diesel Price) केंद्रीय उत्पादन शुल्क कमी केले आणि भाजप शासित राज्यांनी व्हॅट दर कमी करण्याची खात्री केली. मोदींच्या परिवाराला हा थेट दिलासा आहे. हेच कारण आहे की आजही भाजप शासित राज्ये आणि इतर राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरात सुमारे १५ रुपये आणि डिझेलच्या दरात सुमारे ११ रुपयांची तफावत असल्याचे पुरी यांनी सांगितले. (Petrol Diesel Price)
Petrol and Diesel prices reduced by Rs 2 per litre: Sources pic.twitter.com/EsKRPQLp4i
— ANI (@ANI) March 14, 2024
कोणत्या शहरात पेट्रोलचे किती दर?
शहर जुने दर नवीन दर
मुंबई – 106.31 104.2
कोलकाता – 106.3 103.94
चेन्नई – 102.63 100.75
नवी दिल्ली – 96.72 94.72
(हेही वाचा – Batman Squad : रेल्वेचे ‘बॅटमॅन’ रात्रीचे तैनात, बॅटमॅन पथकाकडून तिकीट तपासणी)
कोणत्या शहरात डिझेलचे किती दर?
शहर जुने दर नवीन दर
मुंबई – 94.27 92.15
कोलकाता – 92.76 90.76
चेन्नई – 94.24 92.34
नवी दिल्ली – 89.62 83.62
हेही पहा –
Join Our WhatsApp Community