युक्रेनने रशियाच्या सीमावर्ती (Russia Ukraine War) भागात बेलगोरोड येथे सलग आठ क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर इतर सहा जण जखमी झाले. रशियाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी हा हल्ला करण्यात आला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी गुरुवारी (१४ मार्च) केलेल्या दाव्यात असेही म्हटले आहे की युक्रेनच्या सैन्याने सीमावर्ती कुर्स्क प्रदेशात हल्ल्याचा प्रयत्न केला होता, परंतु रशियाने तो हाणून पाडला. (Russia Ukraine War)
(हेही वाचा – B.S. Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल)
रशियाचा युक्रेनमध्ये मोठा ड्रोन हल्ला :
रशियाने युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) मोठा ड्रोन हल्ला केला. गेल्या काही आठवड्यांत युक्रेनमध्ये हल्ले वाढले आहेत. रशियातील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांच्या वेळी हे हल्ले झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन पुन्हा निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुतीन यांनी गुरुवारी एका व्हिडिओ संदेशात रशियन नागरिकांना मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले. (Russia Ukraine War)
१५ – १७ मार्च रोजी होणार निवडणूक :
रशियात १५ – १७ मार्चला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. दरम्यान युक्रेनच्या ईशान्येकडील सुमी आणि खार्किव भागात रात्रीच्या वेळी ३६ ड्रोनद्वारे हा हल्ला करण्यात आला. दळणवळण केंद्रांचेही नुकसान झाले. सुमीमधील दूरचित्रवाणी आणि रेडिओ केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. (Russia Ukraine War)
(हेही वाचा – Terrorist Attack : लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतात दहशतवादी हल्ला करण्याची घोरीची धमकी; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल)
मोबाईल फोन सिग्नलवरही परिणाम :
सुमी प्रशासनाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की; “नुकसान झाल्यामुळे या प्रदेशातील काही भागांना युक्रेनियन दूरदर्शन आणि रेडिओचे सिग्नल मिळू शकले नाहीत. परिसरातील मोबाईल फोन सिग्नलवरही परिणाम होऊ शकतो.” (Russia Ukraine War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community