फाॕरेन्सिकमध्ये राज्याला नंबर वन आणणार. बँका, नाॕन बँकींग फायनान्शियल डिस्ट्रीब्युटर, रेग्युलेटर, सोशल साईटस एकाच प्लॕटफाॕर्मवर असतील, सायबर गुन्हा घडला विशेषतः पैशाच्याबाबतीत फसवणुकीची घटना घडली की, तासाभरात पैसे परत मिळतील. असा चांगला प्लॕटफाॕर्म करण्याचे काम सुरु आहे. हा देशातला सर्वोत्तम प्लॕटफाॕर्म असणार आहे. यातून सायबर सुरक्षा मिळेल. कोकणात पायाभूत सुविधा, नवीन मानकं तयार करण्यावर शासनाने मोठा भर दिला आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
(हेही वाचा – Terrorist Attack : लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतात दहशतवादी हल्ला करण्याची घोरीची धमकी; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल)
पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस वसाहत नुतन इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते गुरुवार १४ मार्च रोजी करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, आमदार योगेश कदम, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधूरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, बाळ माने आदी उपस्थित होते.
(हेही वाचा – B.S. Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल)
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा व भारतीय साक्ष कायदा या नव्या कायद्यांमुळे जलद न्याय मिळणार आहे. फाॕरेन्सिक पुरावा साक्ष म्हणून कसा धरता येईल त्यादृष्टीने कायदा केला आहे. फाॕरेन्सिक क्षमता वाढविण्याचे कामही केले आहे. येत्या ३ ते ४ महिन्यात फाॕरेन्सिकमध्ये राज्याला नंबर वन मध्ये आणणार. न्याय जलद मिळाला पाहिजे, यासाठी केंद्र आणि राज्य शासन काम करत आहे. सायबर सुरक्षा देण्याचे काम होत आहे. (Devendra Fadnavis)
(हेही वाचा – Russia Ukraine War : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी यूक्रेनचा रशियावर हल्ला; सीमावर्ती भागात आठ क्षेपणास्त्रे डागली)
काजू उत्पादकांसाठी साडेतीनशे कोटी मिळणार :
कोकणात पायाभूत सुविधा कशा तयार करता येतील, नवीन मिनकं कशी तयार करता येईल, यावर शासनाने मोठा भर दिला आहे. काजू उत्पादकांसाठी साडेतीनशे कोटी देण्याचा निर्णय केला आहे. (Devendra Fadnavis)
🕑 2.40pm | 14-3-2024 📍Ratnagiri | दु. २.४० वा. | १४-३-२०२४ 📍 रत्नागिरी.
Foundation Stone Laying / Bhumipujan of :
भूमिपूजन कोनशिला अनावरण:
✅ Office of the Superintendent of Police | पोलीस अधीक्षक कार्यालय
✅ Police Housing New Building | पोलीस वसाहत नूतन इमारत
✅… pic.twitter.com/YseMnZCEwS— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 14, 2024
बचत गटाचं भांडवल दुप्पट :
सर्व सामान्यांचा विचार करणारं आपलं सरकार आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बचत गटाचं भांडवल दुप्पट केलं आहे. महिलांच्या हातांना रोजगार देण्याचं काम, त्यांना सक्षम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शक्तीवंदना च्या माध्यमातून केले आहे. जिल्ह्यातल्या बचत गटांना मिळलेल्या २३५ कोटीमधून महिला अत्यंत वेगाने रोजगारविषयक काम सुरु करतील त्यातून त्या सक्षम होतील, असेही ते (Devendra Fadnavis) म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community